आयपीएल 2023च्या प्लेऑफमध्ये जागा बनवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ प्रयत्नात आहे. रविवारी (21 मे) आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात आमना सामना होणार आहे. दोन्ही संघ लीग स्टेजचा आपला अंतिम सामना खेळण्यासाठी बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियवर उपस्थित आहेत. पण या सामन्यातआधी झालेल्या पत्रकार परिषदेत आरसीबीचे डायरेक्टर माइक हेसन यांनी चाहत्यांसाठी एक निराशआजनक बातमी दिली.
ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड याच्या रूपात जोश हेजलवूड (Jos Hazlewood) मागच्या काही महिन्यांपासून दुखापतीशी झगडत आहे. अशात आयपीएल 2023मधील आपला शेवटचा लीग सामना खेळण्याआधी त्याला पुन्हा एकदा दुखापतीमुळे माघार घ्यावी लागत आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याआधी आरसीबीचे डायरेक्टर माइक हेसन (Mike Hesson) माध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘हेजलवूड मायदेशात परतणार असल्याचे सांगितले. अशात गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात तो खेळेल, अशी जराही अशा नाही. दुर्दैवाने त्याला पुन्हा दुखापत झालीये.’
आयपीएल 2023मध्ये हेजलवूड फक्त तीन सामने खेळला आहे, ज्यामध्या त्याने 3 विकेट्स घेतल्या. यावर्षी आयपीएल हंगामातील पूर्वार्धातही हेजलवूड आरसीबीसाठी उपलब्ध नव्हता. दुखापतीच्या कारणास्तव तो हंगामातील सुरुवातीचे सामने खेळू शकला नव्हता. त्याने हंगामातील आपला पहिला सामना 1 मे रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळला होता. अशातच आता पुन्हा दुखापत झाल्याने तो माघार घेत आहे. आरसीबीने प्लेऑमध्ये जागा बनवली, तरीही हेजलवूनड संघात पुनरागमन करू शकणार नाही.
दरम्यान, आयपीएल संपल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यदाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात आमने सामने आहेत. जोस हेजलवूड या अंतिम सामन्याचा एक महत्वाचा भाग आहे. मात्र, दुखापतीमुळे त्याला या सामन्यातहून माघार घेण्याची वेळ येऊ शकते. (Jos Hazlewood withdrew from IPL 2023 midway due to injury)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तब्बल 4 वर्षांनंतर रिंकूने केला मोठा विक्रम, रोहित तर सोडाच; धोनी अन् डिविलियर्सलाही टाकलं मागे
ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सांगितले बुमराह-पंतचे महत्व, दुखापतीची किंमत भारत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये मोजणार!