नुकतेच न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत टीम इंडियाचा 0-3 अशा फरकाने पराभव झाला. या मालिकेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी अतिशय खराब कामगिरी केली. त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. टीम इंडिया आता ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा संघही जाहीर करण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाला ही मालिका जिंकण्यासाठी चमकदार कामगिरी करावी लागणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या एका वेगवान गोलंदाजाने टीम इंडियाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला वाटते की, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील व्हाईटवॉशने बॉर्डर गावस्कर ट्राॅफीपूर्वी हेझलवुडने सिडनी मॉर्निंग हेराल्डला सांगितले की, “एका दिग्गज झोपलेल्या संघाला आम्ही जागे करु, किवी संघाविरुद्ध 3-0 ने मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाचे आत्मविश्वास कमी झाले आहे. त्यामुळे आम्ही देखील भारताला व्हाईटवॉश करु. संघातील काही खेळाडू येथे (ऑस्टेलिया) पहिल्यांदाच खेळत आहेत. त्यामुळे आम्हाला रणनीती आखणे सोपे होईल.
जोश हेझलवूडने न्यूझीलंडचे कौतुक केले आणि सांगितले की त्यांनी खूप चांगले काम केले आहे. याचे संपूर्ण श्रेय किवी संघ आणि त्यांच्या खेळाडूंना जाते. असे हेजलवूडने सांगितले. टीम इंडियाविरुद्ध भारतामध्ये 3-0 असा विजय मिळवणे अविश्वसनीय आहे. मालिकेतील प्रत्येक सामना सोडा, भारतात एकही सामना जिंकणे कठीण आहे. तो म्हणाला की ही खूप मोठी मालिका आहे. प्रत्येक वेळी आम्ही भारताशी खेळतो तेव्हा ते ॲशेसच्या बरोबरीचे असते.
हेही वाचा-
‘… तर त्याला कर्णधार नाही तर खेळाडू म्हणून सहभागी करा’, माजी दिग्गजाची रोहित शर्माबाबत मोठी प्रतिक्रिया
“फिरकी गोलंदाजी खेळण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे….” इंग्लंडच्या माजी कर्णधारानं टीम इंडियाला डिवचलं
Happy Birthday Virat Kohli: ‘चेस मास्टर’ विराट कोहलीचे हे 5 विक्रम मोडणे अशक्य! जवळपासही कोणी नाही