आयपीएल 2025 (IPL 2025) स्पर्धेत क्वालिफायर सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Punjab kings vs Royal Challengers bangaluru) संघात खेळण्यात आला. या सामन्यात आरसीबीने 8 विकेट्सने पंजाबचा शानदार पराभव केला. ज्या सोबतच आरसीबीने अंतिम सामन्यात त्यांचे स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात आरसीबीकडून वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड (Josh Hazlewood) आणि सुयश शर्माने (Suyash sharma) कमालीची गोलंदाजी केली. दोघांनी मिळून तीन-तीन विकेट्स त्यांच्या नावावर केल्या. या तीन विकेट सोबत जोश हेजलवुडने या सामन्यात इतिहास रचला आहे .
हेझलवुडने या सामन्यात 3.1 षटकात 21 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. यासोबतच जोश हेजलवुड आरसीबीसाठी पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे, ज्याने प्लेऑफ सामन्यांमध्ये गोलंदाजी करत तीन विकेट्स स्वतःच्या नावावर केलेल्या आहेत. याआधी आरसीबीसाठी हा कारनामा माजी भारतीय दिग्गज अनिल कुंबळे यांनी करून दाखवला होता.





