---Advertisement---

डब्ल्यूटीसी फायनलआधी ऑस्ट्रेलियासाठी गुड-न्यूज, वेगवान गोलंदाजाचे संघात पुनरागमन

On: सोमवार, मे 29, 2023 9:46 PM
Australia
---Advertisement---

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ डब्ल्यूटीसी 2021-23च्या अंतिम सामन्यात आमने सामने आहेत. या महत्वाच्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियन संघासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड दुखापतीतून सावरला असून आपल्या संघासाठी डब्ल्यूटीसी फायनल खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियन संघाचा हा 32 वर्षीय वेगवान गोलंदाज दुखापतीचे कारण देत आयपीएल हंगाम अर्ध्यात सोडून मायदेशी परतला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी जोश हेजलवूड (Josh Hazelwood) आयपीएल 2023च्या पूर्वार्धातही संघासाठी उपलब्ध नव्हता. त्याने हंगामात फक्त तीन सामने खेळले आणि तीन विकेट्स घेतल्या. आरसीबीसाठी लीग स्टेजचा शेवटचा सामना ‘करो या मरो’ होता. पण हेजलवूड दुखापतीमुळे या सामन्यात खेळला नाही आणि मायदेशी परतला. असे असले तरी, आगामी डब्ल्यूटीसी फायनलमध्ये तो आपल्या गोलेंदाजीने ऑस्ट्रेलियाच्या विजयात हातभार लावणार आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या 15 सदस्यीय संघात त्याला घेतले गेले आहे.

हेजलवूड ऑस्ट्रेलियन संघात परतल्यामुळे निवडकर्त्यांना अष्टपैलू मायकल नेसर आणि वेगवान गोलंदाज सीन एबॉट यांना संघात ठेवण्याची आवश्यकता नाहीये. नेसर आणि ऍबॉट सध्या काउंटी क्रिकेट खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मेकडोनाल्ड यांनी नुकतीच अशी माहिती दिली होती की, एखादा खेळाडूला दुखापत झाली, तर या दोघांना संघात घेतले जाईल.

डब्ल्यूटीसी फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा 15 सदस्यीय संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, एलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, जोश इगलिस, उस्मान ख्वाजा, मारनस लाबुशेन, नाथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, डेविड वॉर्नर.
(Josh Hazlewood returns to Australian squad for WTC finals)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video  
‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---