भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयकडे 20 जणांचे अर्ज आले आहेत. यात भारताचे माजी गोलंदाज सुनील जोशी, रमेश पवार, माजी यष्टीरक्षक अजय रात्रा, विजय पवार यांनीही अर्ज केले आहेत.
याबरोबरच माजी महिला कर्णधार ममता माबेन आणि सुमन शर्मा यांनीही अर्ज केले आहे. सुमन शर्मा यांनी याआधी पौर्णिमा राव प्रशिक्षक असताना सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे.
तसेच न्यूझीलंडची माजी महिला क्रिकेटपटू मारिया फाहेय यांनीही अर्ज केला असून त्या सध्या एसीए आकादमीमध्ये प्रशिक्षक म्हणून काम पहातात.
पण सुनील जोशी किंवा रमेश पवार यांना भारतीय महिला संघाचे प्रशिक्षकपद मिळण्याची दाट शक्यता आहे.
पवार यांनी भारताकडून दोन कसोटी सामने खेळले असुन त्यात 6 विकेट्स मिळवल्या आहेत. याबरोबरच त्यांनी 31 वनडे सामनेही भारताकडून खेळले आहेत. त्यात त्यांनी 35.2 च्या सरासरीने 34 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच सध्या ते भारतीय महिला संघाचे प्रभारी प्रशिक्षकही आहेत. भारतीय महिला संघाचे आधीचे प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी काही दिवसांपूर्वी महिला संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पवार यांची प्रभारी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती.
त्याचबरोबर जोशी यांनाही प्रशिक्षकपदाचा बराचसा अनुभव आहे. त्यांनी भारताचे 15 कसोटी आणि 69 वनडे सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. यात त्यांनी कसोटीत 41 आणि वनडेत 69 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच त्यांनी ओमान आणि नुकतेच बांगलादेशचे प्रशिक्षकपद भुषवले आहे.
त्यांनी प्रथम श्रेणीचे 160 सामने खेळले असुन यात 615 विकेट्स घेतल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी जम्मु आणि काश्मिर, आसाम, हैद्राबाद या संघांच्या प्रशिक्षकपदीही काम केले आहे.
महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलेल्या सदस्यांची मुलाखत सर्वोच्च न्यायालयाने नेमुन दिलेल्या समिती सदस्य डायना एडलजी, व्यवस्थापक सबा करिम आणि कार्यकारी सचिव अमिताभ चौधरी घेतील.
आरोठे यांनी प्रशिक्षकपद सोडल्यामुळे बीसीसीआयने पूर्ण वेळ प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने लॉर्ड्सवरील घंटा वाजवल्यानंतर होणार भारत-इंग्लंड कसोटी सामन्याला सुरुवात
–टॉप ५: इंग्लंड विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटी सामन्यात या विक्रमांकडे असेल लक्ष
–एमएस धोनीनंतर हर्ष गोएंकानी साधला रवि शास्त्रींवर निशाना