---Advertisement---

आयपीएल 2023च्या पहिल्याच सामन्यात घडली ऐतिहासिक घटना, हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने लिहिला इतिहास

On: शुक्रवार, मार्च 31, 2023 8:50 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या रणसंग्रामाला शुक्रवारपासून (31 मार्च) सुरुवात झाली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूने आयपीएल पदार्पण केले. 

आयपीएल 2023 च्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्स समोरासमोर आले. प्रथमच नव्या नियमाने खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या या हंगामात गुजरातने या सामन्यात आयर्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलला पदार्पणाची संधी दिली. आयपीएलच्या कोणत्याही हंगामात खेळणारा तो पहिला आयरिश खेळाडू बनला.

 

आयपीएल लिलावात त्याला मोठी मागणी असलेली दिसलेली. गुजरात टायटन्स व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघांनी त्याच्यावर बोली लावलेली. अखेर तब्बल 4 कोटी 40 लाखांच्या रकमेसह गुजरातने त्याला आपल्या संघात सामील करून घेतले. आयपीएलच्या इतिहासात बोली लागलेला तो पहिला आयरिश क्रिकेटपटू ठरला.

यापूर्वी आयपीएल लिलावात आयर्लंड संघाकडून खेळल्यानंतर आयपीएल खेळलेला पहिला खेळाडू ओएन मॉर्गन होता. मात्र, त्याने लिलावात इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणून नाव नोंदवलेले. लिटल हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज असून, लंकन प्रीमियर लीग तसेच द हंड्रेड या मोठ्या लीगमध्ये देखील त्याने सहभाग नोंदवला आहे. तसेच टी20 विश्वचषकात त्याने हॅट्रिक मिळवण्याची कामगिरी देखील केली होती. याच कारणाने त्याला आयपीएलमध्ये मोठी रक्कम मिळालेली. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा विचार केल्यास त्याने 25 वनडे सामन्यात 38 व टी20 क्रिकेटच्या 53 सामन्यात 62 बळी मिळवले आहेत.

(Joshua Little Become First Irish Cricketer Who Play In IPL Debute For Gujarat Titans)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---