भारतासोबतच जगभरातील क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा आता संपली आहे. इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात 7.30 वाजता खेळला जाणार आहे. यापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर 7.10 वाजता उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक गुजरात टायटन्स संघाने जिंकली असून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना जिंकून विजयी सुरुवात करण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
आमने-सामने कामगिरी
गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) संघात 2 सामने खेळले गेले आहेत. या दोन्ही सामन्यात हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने एमएस धोनी (MS Dhoni) याच्या चेन्नईला पराभूत केले आहे. आता आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत उभय संघ तिसऱ्यांदा एकमेकांचा सामना करणार आहेत. या सामन्यात कोण विजयी होतं हे पाहणे रंजक ठरणार आहे. (Gujarat Titans have won the toss and have opted to field IPL 2023)
https://twitter.com/IPL/status/1641798202654613505
उभय संघाची प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, केन विलियम्सन, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ
चेन्नई सुपर किंग्स
डेवॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, बेन स्टोक्स, अंबाती रायुडू, मोईन अली, शिवम दुबे, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, मिचेल सँटनर, दीपक चाहर, राजवर्धन हंगरगेकर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वयाच्या 32व्या वर्षीय इंग्लंडचा दिग्गज करतोय आयपीएल पदार्पण, पण सोप्पा नसेल मार्ग; वाचा सविस्तर
न्यूझीलंडकडून श्रीलंकेला दणका, 44 वर्षांत पहिल्यांदा आली ‘अशी’ वेळ





