एकीकडे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये डे-नाईट टेस्ट मॅच खेळली जात आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध खेळत आहे. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सेंट जॉर्ज पार्कवर दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. संघाचा फलंदाजी प्रशिक्षक संघ सोडून गेला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटपटूने दक्षिण आफ्रिकेच्या मर्यादित षटकांच्या संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे.
क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने शुक्रवारी याची घोषणा केली. ड्युमिनीने गेल्या वर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली होती. परस्पर संमतीने त्यांनी तत्काळ प्रभावाने आपले पद सोडल्याचे सीएसएने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू जेपी ड्युमिनी मार्च 2023 मध्ये त्याची नियुक्ती झाल्यापासून मर्यादित षटकांच्या कोचिंग स्टाफचा प्रमुख सदस्य आहे. असे सीएसएने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्याच्या जागी लवकरच मर्यादित षटकांच्या संघासाठी फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. जे पी ड्युमिनीने 2004 ते 2019 दरम्यानच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत दक्षिण आफ्रिकेसाठी 46 कसोटी, 199 वनडे आणि 81 टी20 सामने खेळले आहेत.
???? BREAKING ????
JP Duminy has stepped down as South Africa’s white-ball batting coach, citing personal reasons ????????????#Cricket #SouthAfrica #JPDuminy pic.twitter.com/NyVANH6BZY
— Sportskeeda (@Sportskeeda) December 6, 2024
पाकिस्तान संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जात असताना ड्युमिनीने संघ सोडला आहे. पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सर्व प्रथम, या दौऱ्यावर 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाईल. ज्यातील पहिला टी20 10 डिसेंबरला आणि दुसरा सामना 13 डिसेंबरला होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना 14 डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर दोन्ही संघ 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत आमनेसामने येतील. 17 ते 22 डिसेंबर दरम्यान वनडे मालिका खेळवली जाणार आहे. आणि त्यानंतर 26 डिसेंबरपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल.
हेही वाचा-
भारतीय संघ गुलाबी चेंडूने चमकदार कामगिरी करण्यात अयशस्वी! दिग्गजाची निराशाजनक प्रतिक्रिया
विराट-राहुलसाठी स्टार्कने आखला होता खास प्लॅन! दिग्गजाचा मोठा खुलासा
IND vs AUS; स्लेजिंग मूडमध्ये विराट कोहली, ऑस्ट्रेलिया फलंदाजांना केले तंग






