fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

युएस ओपन: नदालची दुखापतीमुळे माघार, डेल पोट्रोचा अंतिम फेरीत प्रवेश

युएस ओपनच्या उपांत्य फेरीतून राफेल नदाल गुडघा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. यामुळे आता जुआन डेल पोट्रो अंतिम फेरीत पोहचला आहे.

या स्पर्धेत तिसरे मानांकन असणारा डेल पोट्रो 2009 युएस ओपनचा विजेता आहे. नदाल बाहेर पडण्याआधी डेल पोट्रो 7-6, 6-2 असा आघाडीवर होता.

या सामन्यात पहिल्याच सेटमध्ये नदालला उजव्या गुडघ्याचा त्रास जाणवू लागला होता. यावेळी त्याला दोनदा त्याच्या गुडघ्याला पट्टी बांधावी लागली होती.

या संपूर्ण स्पर्धेत नदाल 15 तास 54 मिनिटे खेळला असे आतापर्यंत कोणत्याच टेनिसपटूने केले नाही. यामध्ये डॉमिनिक थिम विरुद्ध झालेल्या उपांत्यपुर्व फेरीचाही समावेश आहे. ही लढत सुमारे पाच तास चालली आणि पहाटे दोनला संपली.

तसेच यावर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपनच्या उपांत्यपुर्व फेरीतही नदाल मारीन चिलिच विरुध्द गुडघा दुखापतीमुळे बाहेर पडला होता.

नदाल हा त्याच्या चौथ्या युएस ओपनच्या आणि कारकिर्दीतील 18व्या विजेतेपदसाठी खेळत होता. यावेळी त्याने दोन ब्रेक पॉइंट वाचवले तर डेल पोट्रो त्याचा नैसर्गिक खेळ केला.

“माघार घेणे मला आवडत नाही”, असे नदाल यावेळी म्हणाला.

“एकाने खेळावे आणि दुसऱ्याने फक्त बसुन रहावे मग तो काही टेनिसचा सामना झाला नाही”, असेही तो पुढे म्हणाला.

डेल पोट्रो आणि नदाल हे दोघे 17 वेळा आमने-सामने आले असून नदालने 11 सामने जिंकले आहेत.

“हा विजय योग्य नाही. मला राफा विरुद्ध खेळायला आवडते कारण तो एक खुप मोठा प्रतिस्पर्धी आहे. मला त्याला असे दुखापतीला सामोरे जाताना वाईट वाटत आहे”, असे 29 वर्षीय डेल पोट्रो म्हणाला.

डेल पोट्रो अंतिम सामन्यात 2011 आणि 2015चा युएस ओपन विजेता नोवाक जोकोविच विरुद्ध खेळणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कूक आणि टीम इंडियाचे नाते खास…शेवटच्या सामन्यातही मोठा पराक्रम

इंडिया ब्ल्यू संघाने जिंकले दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद

You might also like