पहिल्या ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियन्सशीप २०१९-२० स्पर्धाच्या बादफेरीचे सामने आजपासून सुरुवात होत आहेत. १३ पैकी ८ संघांनी बादफेरीत प्रवेश केला आहे. किश इस्लान्ड, इराण येथे यास्पर्धे होत आहे. इराण, थायलंड, पाकिस्तान, डेन्मार्क, बांग्लादेश, चिनी तैपाई, केनिया आणि श्रीलंका यासंघांनी बादफेरीत प्रवेश केला आहे.
यजमान इराणने त्यांच्या गटात तीन सामने जिंकत बादफेरीत प्रवेश केला. तसेच पाकिस्तान, बांगलादेश, केनिया, थायलंड यांनी प्रत्येकी २ विजयासह बादफेरीत प्रवेश मिळवला. तर श्रीलंका, चिनी तैपेई, डेन्मार्क यांनी प्रत्येकी १ विजयासह बादफेरी गाठली.
पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत डेन्मार्क विरुद्ध केनिया अशी लढत होईल. इराण विरुद्ध चिनी तैपेई असा दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. श्रीलंका समोर पाकिस्तानचे कडवे आव्हान असेल तर थायलंडचा संघ बांगलादेश विरुद्ध दोन हात करेल.