यूएई आणि ओमानमध्ये सध्या टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार सुरू आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर,भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी२० मालिकेला प्रारंभ होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली. परंतु, संजू सॅमसनला संधी न दिल्यामुळे चाहते भलतेच नाराज झाले आहेत.
बीसीसीआयने या मालिकेसाठी अनेक बड्या खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यांच्या ऐवजी युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. परंतु आयपीएल स्पर्धेत धावांचा पाऊस पाडून सुद्धा संजू सॅमसनला संधी दिली गेली नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी जाब विचारायला सुरुवात केली आहे.
सध्या संजू सॅमसनला समर्थन करण्यासाठी सोशल मीडियावर जस्टिस फॉर संजू सॅमसन हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. अनेकांनी बीसीसीआयच्या या निर्णयाला चुकीचे ठरवत प्रश्न विचारायला सुरुवात केली. अनेकांचे असे म्हणणे आहे की, संजू सॅमसन प्रत्येक आयपीएल स्पर्धेत धावांचा पाऊस पाडतोय तरी देखील त्याला संधी दिली जात नाहीये.
एका युजरने ट्विट करत लिहिले की, ‘रोहित शर्मा २०१३ पर्यंत काहीच कामाचा नव्हता. परंतु धोनीने त्याला संधी दिली. आता त्याने संजू सॅमसनला संधी दिली पाहिजे. परंतु तो खेळाडूंविषयी पक्षपात करत आहे. “तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘जे व्हायचे होते तेच झाले. संजू सॅमसन पुन्हा एकदा संघाबाहेर. त्याने आयपीएलच्या हंगामात जबरदस्त कामगिरी केली. १८ व्या वर्षी सुरुवात करत त्याने एमर्जींग प्लेअरचा पुरस्कार देखील पटकावला होता.तो आता २६ वर्षाचा आहे. तरीदेखील त्याला संधी नाही.”
Kumar Sangakara could recognize but when will BCCI recognize Sanju Samson ???? #JusticeForSanjuSamson pic.twitter.com/aqv2iHU6Dc
— . (@bestwicketkeper) November 9, 2021
So as usual Sanju is dropped???? Man literally had his best IPL season????
Sanju started playing IPL at the age of 18 also won the emerging player award. He is now 26!
If groomed earlier he could hv been our no4.
Don't want him to be a wasted talent????#JusticeForSanjuSamson pic.twitter.com/eRi3Vuvsll— M (@Blair_Waldorf45) November 9, 2021
So as usual Sanju is dropped???? Man literally had his best IPL season????
Sanju started playing IPL at the age of 18 also won the emerging player award. He is now 26!
If groomed earlier he could hv been our no4.
Don't want him to be a wasted talent????#JusticeForSanjuSamson pic.twitter.com/eRi3Vuvsll— M (@Blair_Waldorf45) November 9, 2021
तसेच आणखी एका युजरने ट्विट करत लिहिले की,” मला माहित नाही की बीसीसीआय संजू सॅमसनला समर्थन का देत नाही. त्याने आयपीएल आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत सतत चांगली कामगिरी केली आहे. ते म्हणतात की तो सतत चांगली कामगिरी करत नाही. पण आता काय? त्याच्याकडे का दुर्लक्ष केले जात आहे.’






