---Advertisement---

मोठी बातमी! लखनऊला आयपीएल ट्रॉफी जिंकवण्याची जबाबदारी जस्टीन लँगरकडे, मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

On: शुक्रवार, जुलै 14, 2023 7:55 PM
Justin Langer
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगची फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सला नवीन प्रशिक्षक मिळाले आहेत. दिग्गज जस्टीन लँगर आगामी आयपीएल हंगामात लखनऊच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसतील. फ्रँचायझीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या नियुक्तीची माहिती दिली.

शुक्रवारी (14 जुलै) लखनऊ सुपर जायंट्सला जस्टिन लँगर (Justin Langer) यांच्या रुपात नवीन मुख्य प्रशिक्षक मिळाला. लँगर यांना ही जबाबदारी देण्याच्या काही तास आधीच अँडी फ्लॉवर यांच्याकडून लखनऊचे मुख्य प्रशिक्षकपद काढून घेतल्याची माहिती समोर आली होती. अँडी यांना आपण करारातून मुक्त करत आहोत, अशी माहिती लखनऊ सुपर जायंट्सच्याच अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून दिली गेली होती. अँडी यांच्या मार्गदर्शनात लखनऊ सुपर जायंट्स त्यांच्या पहिल्या दोन्ही हंगामांमध्ये प्लेऑफसाठी पात्र ठरला होता.

दरम्यान, जस्टीन लँगर () हे ऑस्ट्रेलियन संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक राहिले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये मॅथ्यू हेडन आणि जस्टिन लँगर या ऑस्ट्रेलियन सलामीवीर जोडीने जगभरात आपली झाप सोडली होती. 2018 साली लँगर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले. त्यांच्या मार्गदर्शनात ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेत इंग्लंडला 4-0ने पराभूत केले. तसेच ऑस्ट्रेलियाने 2021 मध्ये जिंकलेला टी-20 विश्वचषक देखील लँगर यांच्याच कार्यकाळातील आहे. त्याचसोबत ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये पर्थ स्कॉचर्सचेने तीन लँगर यांच्या मार्गदर्शनात तीन वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. भविष्यात लखनऊ सुपर जायंट्सलाही ते आयपीएल ट्रॉफी जिंकवून देतील, अशी इच्छा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

“लखनऊ सुपर जायंट्स ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक जस्टीन लँघर यांना संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करत आहे. अँडी फ्लॉवर यांचा दोन वर्षांच्या कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी संघासाठी दिलेल्या योगदानासाठी आभार मानले आहे,” असे लखनऊ सुपर जायंट्सकडून सांगितले गेले आहे. (Justin Langer appointed as the head coach of Lucknow Super Giants.)

महत्वाच्या बातम्या –
दक्षिण विभाग दुलीप ट्रॉफी विजयाच्या दिशेने! कवीरप्पाच्या 7 बळींनी मोडले पश्चिम विभागाचे कंबरडे
BREAKING । भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा! डिसेंबर-जानेवारीत तीन मालिकांचे आयोजन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---