---Advertisement---

BREAKING । भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा! डिसेंबर-जानेवारीत तीन मालिकांचे आयोजन

On: शुक्रवार, जुलै 14, 2023 7:14 PM
Team India
---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने शुक्रवारी (14 जुलै) भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा केली. या दौऱ्यात भारतीय संघाला तीन टी-20 आंतरराष्ट्रीय, तीन वनडे आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 दरम्यान ही मालिका आयोजित केली गेली आहे.

भारतीय संघ (Team India) सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडीजवविरुद्धचा शेवटचा सामना संघाला 13 ऑगस्ट रोजी खेळायचा आहे. त्यानंतर संघ तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी आयर्लंड दौरा करणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील ही मालिका 18 ते 23 ऑगस्टदरम्यान खेळली जाईल. त्यानंतर संघ थेट ऑक्टोबर महिन्यात वनडे विश्वचषक खेळण्यासाठी मैदानात उतरेल. वनडे विश्वचषकानंतर भारतीय संघ या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. 26 ते 30 डिसेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात बॉक्सिंग डे कसोटी सामना खेळला जाईल.

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा:
पहिला टी-20 सामना – 10 डिसेंबर
दुसरा टी-20 सामना – 12 डिसेंबर
तिसरा टी-20 सामना – 14 डिसेंबर

पहिला वनडे सामना – 17 डिसेंबर
दुसरा वनडे सामना – 19 डिसेंबर
तिसरा वनडे सामना – 21 डिसेंबर

पहिली कसोटी – 26 ते 30 डिसेंबर
दुसरी कसोटी – 3 ते 7 जानेवारी
(BCCI have confirmed the schedule of India’s tour of South Africa.)

महत्वाच्या बातम्या –
भारतीय खेळाडूंना हिणवणाऱ्या इंग्लिश दिग्गजाकडून यशस्वीचे कौतुक, ट्विट करत म्हणाला, ‘हा सुपरस्टार…’
वेस्ट इंडीजविरूद्ध रोहित दाखवतो ‘हिटमॅन’ अवतार! आकडेवारी पाहून व्हाल चकित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---