नुकतीच बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत बांगलादेश संघातील फलंदाज आणि गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत ऑस्ट्रेलिया संघाला ४-१ ने पराभूत केले. ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर बांगलादेश संघातील खेळाडूंनी जोरदार जल्लोष साजरा केला होता, ज्याचा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर अपलोड केला होता. हे पाहून ऑस्ट्रेलियाच्या मुख्य प्रशिक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पहिल्यांदाच मालिका जिंकून बांगलादेश संघातील खेळाडूंनी जोरदार उत्साह साजरा केला होता. ते आपले राष्ट्रीय गीत गाऊ लागले होते. हा व्हिडिओ क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ‘द मॉर्निंग हेराल्ड’ च्या वृत्तानुसार, हे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जस्टिन लेंगर यांना आवडले नव्हते. हा व्हिडिओ पोस्ट करण्यावरून जस्टिन लेंगर आणि स्टाफमधील एक सदस्य यांच्यात वाद देखील झाला होता.
व्हिडिओमुळे झाला वाद
द मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार लेंगर आणि ऑस्ट्रेलियन संघाचे मॅनेजर गोविन डोवी, हे दोघेही क्रिकेट डॉट कॉम एयुच्या सांकेतिक स्थळावर व्हिडिओबाबत चर्चा करताना दिसून आले होते. ही चर्चा नुकत्याच संपन्न झालेल्या टी-२० सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर झाली होती. बांगलादेशने सलग ३ टी-२० सामने आधीच मालिका खिशात घातली होती.(Justin Langer in heated confrontation with cs staffer over Bangladesh celebration video)
ऑस्ट्रेलिया संघ मालिकेत पराभूत झाल्यानंतर सुरुवातीला डोवि हे प्रकरण उचलून धरले होते. परंतु जेव्हा त्यांनी समजून घेतले नाही, तेव्हा लेंगर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केले होते. डोवि यांचे स्पष्ट म्हणणे होते की, “बांगलादेश संघाचे गीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या सांकेतिक स्थळावर अपलोड करणे चुकीचे होते. ही घटना कमीतकमी एक डझन लोकांनी पहिली आणि काही खेळाडूंना हे पाहून अस्वस्थ वाटत होते.”
Scenes! The Aussies sportingly applauded their rivals post match as Bangladesh celebrated a landmark success in their cricket history… #BANvAUS pic.twitter.com/zO2DBRUorf
— cricket.com.au (@cricketcomau) August 7, 2021
लेंगरने या प्रकरणात कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु डोवि म्हणाले की, “चांगल्या सांघिक वातावरणात प्रामाणिक आणि स्पष्ट चर्चेचा देखील समावेश असतो. मग ते खेळाडू असो सपोर्ट स्टाफ असो किंवा संघातील इतर सदस्य असो. जसे की या प्रकरणात घडले.”
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीच्या नेतृत्वात चुका शोधून काढणाऱ्यांना जड्डूचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाला…
विगलीकरणात सूर्या अन् पृथ्वीमध्ये घुसला ‘ऍक्टिंगचा किडा’, अभिनयात सलमान-आमिरलाही दिली टक्कर!
लॉर्ड्सवर संपणार विराटच्या शतकांचा दुष्काळ? ‘हे’ आहे कारण