---Advertisement---

आता गुरू जस्टिन लॅंगर दाखवणार आॅस्ट्रेलियाला मार्ग, प्रशिक्षकपदी नियुक्त

---Advertisement---

सिडनी | आॅस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने जस्टिन लॅंगरला गुरूवारी राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक घोषीत केले. तो चेंडू चेडछाड प्रकरणानंतर राजीनामा दिलेल्या डॅरेन लेहमनच्या जागी हा पदभार स्विकारेल. 

मार्च महिन्यापासून हे पद रिक्त होते. ४७ वर्षीय लॅंगर सध्या वेस्टर्न आस्ट्रेलिया आणि पर्थ स्काॅचर्सचा प्रशिक्षक होता. त्याचा क्रिकेट आॅस्ट्रेलियासोबतचा हा करार ४ वर्षांसाठीचा आहे. 

२२ मे पासून तो हा कार्यभार स्विकारणार आहे. तो आॅस्ट्रेलियाचा तिन्ही प्रकारातील प्रशिक्षक असणार आहे. या ४ वर्षांच्या काळात दोन अॅशेस मालिका, तसेच ५० आणि २० षटकांचा एक-एक  विश्वचषक होणार आहे. 

लॅंगरने १०५ कसोटी सामन्यात ४५.२७च्या सरासरीने ७६९६ धावा केल्या आहेत. १९९३ ते २००७ या काळात खेळताना त्याने कसोटीत २३ शतकेही केली. त्याने आॅस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाचीही भुमिका पार पाडली आहे.

२०१३मध्ये प्रशिक्षकपद स्विकारलेला लेहमन २०१९मध्ये अॅशेस मालिकेनंतर हे पद सोडणार होता. तसे त्याने घोषीतही केले होते. परंतु दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिकेत झालेल्या प्रकरणानंतर त्याने हे पद लगेच सोडले. 

महत्त्वाच्या बातम्या –

दिल्ली डेअरडेविल्सच्या तीन पोरांनी राजस्थान राॅयल्सला रडवले

हा दिग्गज म्हणतोय मुंबई पुढील सहाही सामने जिंकणारच!

राॅजर फेडररची का होतेय आज मोठी चर्चा?

मलिंगाला श्रीलंकाकडून खेळण्यापेक्षा मुंबई इंडियन्स प्रिय

धोनीच्या पिण्याच्या पाण्याचा खर्च ऐकूण थक्क व्हाल!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment