पुणे (27 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आजपासून रेलीगेशन फेरीला सुरुवात झाली. रेलीगेशन फेरीत ‘अ’ व ‘ब’ गटातील बॉटम 4 असे 8 संघ एकमेकांना विरुद्ध खेळणार आहेत. यातील टॉप 2 संघ प्ले-ऑफस साठी पात्र होतील. आज रेलीगेशनचा पहिला सामना अत्यंत चुरशीचा झालेला सामना बरोबरीत राहिला. धुळे, नांदेड व जालना या संघानी रेलीगेशन फेरीत पहिला विजय मिळवला.
आज झालेला रेलीगेशन फेरीचा पहिला सामना बरोबरीत राहिला. रायगड विरुद्ध नाशिक यांच्यात झालेल्या हा सामना 35-35 असा बरोबरीत राहिला. नाशिकच्या शिवकुमार बोरगुडे ने चढाईत 17 गुण मिळवले तर गणेश गीते ने पकडीत 5 गुण मिळवले. तर रायगड कडून प्रशांत जाधव ने अष्टपैलू खेळ करत 15 गुण मिळवले. तसेच धीरज बैलमारे ने सुपर टेन पूर्ण केला. आजच्या दुसऱ्या सामन्यात धुळे संघाने 43-26 असा एकतर्फी विजय मिळवला. धुळे संघाकडून अक्षय पाटील ने 16 गुण मिळवले. वैभव बोरसे ने अष्टपैलू खेळ करत पकडीत 7 तर चढाईत 3 गुण मिळवले.
आज झालेल्या तिसऱ्या लढतीत नांदेड संघाने अटीतटीच्या लढतीत 33-31 अशी धाराशिव संघावर मात दिली. नांदेड कडून याकुब पठाण ने चढाईत 14 गुण मिळवले तर शक्ती शेडमके यांने अष्टपैलू खेळ करत 9 गुण मिळवले. आजच्या शेवटच्या सामन्यात जालना संघाने 33-28 असा सातारा संघावर विजय मिळवला. आकाश दिवते ने अष्टपैलू खेळ करत 9 गुण मिळवले. (K. M. P. Relegation round begins in Yuva Kabaddi Series)
रेलीगेशन फेरी गुणतालिका.
1. धुळे – 6 गुण (1 सामना)
2. जालना – 5 गुण (1 सामना)
3. नांदेड – 5 गुण (1 सामना)
4. नाशिक – 3 गुण (1 सामना)
5. रायगड – 3 गुण (1 सामना)
6. धाराशिव – 1 गुण (1 सामना)
7. सातारा – 1 गुण (1 सामना)
8. लातूर – 0 गुण (1 सामना)
महत्वाच्या बातम्या –
एकाच सामन्यात दोन वेळा मोडला मोठा विक्रम! हैदराबादसाठी अभिषेकने ठोकलं आतापर्यंतचं सर्वोत्तम अर्धशतक
हैदराबादपुढे सगळे सपाट! 20 षटकात 277 धावा कुटल्या आणि मोडला आरसीबीचा महाविक्रम