भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या वनडे मालिकेला गहुंजे येथे सुरुवात झाली. गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमसीए स्टेडियमवर मालिकेतील तिन्ही सामने खेळविले जातील. पहिल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकात ५ बाद ३१७ धावा फलकावर लावल्या. वनडे पदार्पण करणाऱ्या कृणाल पंड्याने तुफानी अर्धशतक झळकावत सर्वांची मने जिंकली. सोबतच नवा विश्वविक्रम आपल्या नावे केला.
कृणालचा कारनामा
भारतीय संघासाठी पहिल्या सामन्यात कृणाल पंड्या व प्रसिद्ध कृष्णा यांनी वनडे पदार्पण केले. कृणालने आपल्या पहिल्याच वनडे सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावले. त्याने २६ चेंडूत अर्धशतक झळकावून, वनडे पदार्पणात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विश्वविक्रम केला. कृणालने ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३१ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. यासोबतच पदार्पणात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक झळकवणारा तो पहिला भारतीय फलंदाज बनला.
भारताने उभाला धावांचा डोंगर
भारतीय संघाने पहिल्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावांचा डोंगर उभारला. भारतासाठी शिखर धवन (९८), विराट कोहली (५६), केएल राहुल (६२) व कृणाल पंड्या (५८) यांनी अर्धशतके ठोकली. इंग्लंडसाठी अष्टपैलू बेन स्टोक्सने ३ तर, मार्क वूडने २ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या –
पदार्पणाची कॅप स्वीकारताना भावूक झालेल्या कृणाल पंड्यासाठी वसीम जाफरचा खास संदेश, म्हणाला…
अभिमानास्पद! १७ वर्षीय शेफाली वर्मा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी
अभिमानास्पद! १७ वर्षीय शेफाली वर्मा आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी