---Advertisement---

ऐकावं ते नवलंच! त्याचा जर्सी क्रमांकच आहे त्याच्या घराचं नाव

On: गुरूवार, ऑक्टोबर 8, 2020 5:29 PM
---Advertisement---

प्रत्येकासाठी आपले घर ही एक खास जागा असते. त्यामुळे त्याचे नावही हटके ठेवण्याचा प्रत्येकजण विचार करतो. भारताचा कबड्डीपटू के प्रपंजननेही त्याच्या घराचे नाव हटके ठेवले आहे, ते नाव इतके हटके आहे की कोणी कदाचीत असा विचारही केला नसेल. त्याचा जर्सी क्रमांकच त्याच्या घराचे नाव आहे. याबद्दल त्यानेच इंस्टाग्राम स्टोरी टाकत माहिती दिली आहे.

प्रो कबड्डीमध्ये सध्या बंगाल वॉरियर्सकडून खेळणाऱ्या प्रपंजनचा जर्सी क्रमांक ११ आहे. त्यामुळे त्याने त्याच्या घराचे नावही ‘११’ असे ठेवले आहे. त्याने इंस्टाग्रामला त्याच्या घराचा फोटो टाकला असून घराच्या छताच्या भींतीवर ११ हा क्रमांक लिहीलेला दिसतो. तसेच त्याने ११ हे नाव घराला का दिले आहे, याचे कारणही फोटोमध्ये सांगितले आहे. त्याने सांगितले आहे की ‘११ हा केवळ आकडा नाही तर ती माझी ओळख आहे.’

Screengrab: Instagram/prapanjan.k

प्रपंजन हा प्रो कबड्डीमध्ये दुसऱ्या मोसमापासून खेळत असून आत्तापर्यंत त्याने ८३ सामने खेळले असून ३७३ गुण मिळवले आहेत. तसेच त्याने ७ व्या प्रो कबड्डी मोसमात २० सामन्यात खेळताना १०५ गुण मिळवले होते. तो प्रो कबड्डीमध्ये आत्तापर्यंत यू मुंबा, तमिळ थलायवाज, तेलगू टायटन्स आणि गुजराज फॉर्च्यूनजायंट्सकडूनही खेळला आहे.

मुळचा तमिळनाडूचा असलेल्या प्रपंजन बाबतीत आणखी एक खास गोष्ट म्हणजे तो इंजिनियर असून त्याने इंजिनियरिंगचे शिक्षण तिरुनेलवेली येथील पीएसएन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग आणि टेक्नोलॉजी येथून पूर्ण केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---