कबड्डी मास्टर्स 2018 स्पर्धेत सोमवार दि. 25 जूनला भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत उपांत्य फेरीत एन्ट्री केली.
या सामन्यात भारताने आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 41-17 अशा फरकाने पराभूत केले.
अजय ठाकूर, मोनु गोयत आणि रोहित कुमारने आक्रमक चढाई करत पाकिस्तानची बचावफळी मोडीत काढली.
तर बचावफळीत गिरीश ऐरनाकने पाकिस्तानच्या पाच चढाईपटूंची पकड केली.
पाकिस्तानला या पराभवानंतरही उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची संधी आहे. जर पुढच्या सामन्यात पाकिस्ताने केनियाला पराभूत केले तर ते उपांत्य फेरीसाठी पात्र होतील.
भारताने सामन्याच्या 9 व्या मिनिटाला पाकिस्तानला ऑलआउट करत 12-3 अशी आघाडी घेतली.
भारतीय संघाने सामन्याच्या सुरवातीला घेतलेली आघाडी कायम राखत पाकिस्तानला 41-17 अशा फरकाने चितपट केले.
यापूर्वी सलामीच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला 36-22 अशा फरकाने पराभूत केले होते.
भारताचा पुढील सामना केनिया विरुद्ध मंगळवार दि.26 जून रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9 वा. होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–चौथ्या कबड्डी विश्वचषकाचे यजमानपद भारताला नाही तर या देशाला मिळणार!
–महाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडीगाने दुबई मास्टर्स स्पर्धेत केले समालोचन








