मुंबई | कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा २०१८ चे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. यामध्ये भारतीय संघ साखळी फेरीत एकूण ४ सामने खेळणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार आहे.
या स्पर्धेत भारतीय संघासोबत अन्य ५ संघ सहभागी होणार असून त्यांचे दोन गट करण्यात आले आहेत. भारतीय संघ अ गटात असून याच गटात पाकिस्तान आणि केनिया हे देश आहेत.
ब गटात इराण, केनिया आणि अर्जेंटीना हे देश आहेत. ही स्पर्धा २२ ते ३० जून या काळात होणार आहे.
२२ ते २७ जून या काळात साखळी सामने होणार आहेत तर २९ जूलै रोजी उपांत्यफेरीचे सामने होणार आहेत. अंतिम सामना ३० जूलै रोजी होणार आहेत.
या स्पर्धेचे सर्व सामने अल वस्ल स्पोर्टस् क्लब, दुबई येथे होणार आहे. भारतात या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर SS2, SS2 HD, SS1 Hindi, SS1 Hindi HD, SS1 Tamil या चॅनेलवर होणार आहे.
दररोज दोन सामने होणार असून पहिला सामना ८ तर दुसरा सामना ९ वाजता दाखविण्यात येणार आहे.
स्पर्धेत एकूण १५ सामने होणार असून हे सर्व सामन्यांचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. हे प्रक्षेपण इंग्रजी, हिंदी आणि तमिळ भाषेत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–संपुर्ण वेळापत्रक- कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धा २०१८चे संपुर्ण वेळापत्रक
-कबड्डी मास्टर्स दुबई स्पर्धेत भारत-पाकिस्तानमध्ये दोन सामने
–ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांच्या निमित्ताने या स्पर्धेतील कबड्डीच्या प्रवासाचा हा खास आढावा
–टाॅप ५- प्रो कबड्डीतील टॉप ५ बचावपटूंच्या कामगिरीवर एक नजर…
-प्रो-कबड्डीमध्ये हे १२ खेळाडू होऊ शकतात १२ संघांचे कर्णधार!