---Advertisement---

सहकार करंडक कबड्डी स्पर्धा गुरुवार पासून

---Advertisement---

क्रीडा भारती व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
पुणे: क्रीडा भारती व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार करंडक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक ९ ते १२ नोव्हेंबर दरम्यान शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे, अशी माहिती क्रीडा भारती पुणेचे अध्यक्ष शैलेश आपटे यांनी दिली.

स्पर्धेमध्ये सहकारी बँकांचे १६ संघ सहभागी होणार आहेत. दिनांक ९ व १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ ते १० यावेळेत तर दिनांक ११ व १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ७ ते १० यावेळेत स्पर्धा होणार आहेत.

ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने होणार आहे. तसेच उद्घाटन समारंभादरम्यान विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाºया १५ खेळाडूंच्या मातांना वीरमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यावेळी रस्सी खेच स्पर्धा देखील होणार आहे.

शैलेश आपटे म्हणाले, स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांच्या हस्ते सायंकाळी ६ वाजता होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दिनांक १२ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता होणार आहे.

यावेळी आमदार विजय काळे, महापौर मुक्ता टिळक उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या संयोजन समितीत महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, मुंबई शाखेच्या महाराष्ट्र अर्बन को-आॅप.बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, अ‍ॅड. सुभाष मोहिते, डॉ गजानन एकबोटे, प्रदिप अष्टपुत्रे, संजय लेले, मिलिंद काळे, शकुंतला खटावकर, हेमंत टाकळकर, दिपक लेले, भगवान सोनवणे, शेखर कुलकर्णी आहेत.

सहभागी संघ –पुणे अर्बन सहकारी बँक , विश्वेश्वर सहकारी बँक, सोपानकाका सहकारी बँक, जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक, शारदा सहकारी बँक, नगर अर्बन सहकारी बँक, ठाणे जनता सहकारी बँक, कॉसमॉस को-आॅप. बँक, विद्या सहकारी बँक, महेश सहकारी बँक.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment