-पराग कदम
कबड्डी हा मराठमोळा खेळ देशपातळीवर व पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्याचा व ती समर्थपणे टिकवुन ठेवण्याचा मान जातो तो स्व.शंकरराव तथा बुवा साळवी यांना. बुवांच्या एका वाक्यची आठवण आज प्रामुख्याने होते ते म्हणजे “ज्यावेळी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र पराभुत होईल त्या वेळी देशभरात कबड्डीचा प्रसार झाला असे समजावे.”
आज आशियाई स्पर्धेमध्ये भारतीय पुरुष कबड्डी संघाची २८ वर्षांची व महिलांची ०८ वर्षांची सुवर्णरुपी मक्तेदारी मोडीत काढत इराणच्या पुरुष व महिला संघाने सुवर्णपदक प्राप्त केले. याचा अर्थ इतर देशात कबड्डीचा प्रसार झाला अस समजायच की भारताची अधोगती यावर चर्चा होऊ शकते.
कबड्डी या खेळाला प्रो कबड्डीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वलय प्राप्त झाले आहे. परदेशी संघ आपल्या भारतीय आजी-माजी खेळाडुंची आपल्या संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करीत आहेत. ही गोष्ट आपल्यालासाठी तर अभिमानास्पद आहे.
आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांमध्ये प्रमुख्याने उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे दक्षिण कोरिया पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक अर्जुन पुरस्कार विजेते अशन कुमार व इराण महिला संघाच्या प्रशिक्षक महाराष्ट्र नाशिकच्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या शैलजा जैन प्रशिश्रकांची. या दोन्ही प्रशिक्षकांनी त्यांच्या संघाला विजयी करण्यात मोठी जबाबदारी पार पडली. याचंबरोबर विश्वकपमध्ये जपान संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी अर्जुन पुरस्कार विजेते अशोक शिंदे यांनीही मोलाची कामगिरी बजावली होती.
अांतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी या खेळाने एक मानाच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. बरेच परदेशी संघ व खेळाडु आता कबड्डीचा सराव करण्यासाठी प्रथम भारतालाच पसंती देत आहेत. बऱ्याच परदेशी संघाना आज भारतीय कबड्डी मधील माजी खेळाडूंची गरज भासत आहे ही किती अभिमानाची गोष्ट आहे आणि बहुतांश भारतीय प्रशिक्षकांनी आपली योग्यता सिद्ध केली आहे. यावरून आपल्या भारतीय कबड्डीमधील खेळण्याचे तंत्र अजूनही सरस आहे हे यावरून वारंवार सिद्ध होते आहे.
आपण कबड्डीमध्ये मागे पडलो नाही, तर इराण आणि दक्षिण कोरिया सारखे देश आपल्या तोडीस तोड खेळ करीत आज यशस्वी होत आहे. कबड्डीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाने आल्याने आता स्पर्धा वाढली आहे तरीही आजही भारत हा कबड्डी विश्वातील एक बलाढ्य संघ आहे आणि भविष्यात सुद्धा बलाढ्य राहीलच यात तिळमात्र शंका नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
– एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक
– …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!
–भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष…
– आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू
–लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे
-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?
-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड
-एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक
-भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी