fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही

साउथॅंप्टन | भारतीय संघ गुरुवारपासून सुरु होत असलेल्या चौथ्या कसोटीसाठी सज्ज झाला आहे. मालिकेत भारत १-२ असा पिछाडीवर असला तरी तिसऱ्या कसोटीत केलेल्या चांगल्या खेळामुळे संघाचे मनोधैर्य नक्कीच वाढले आहे.

मालिकेतील आव्हान राखण्यासाठी तसेच आयसीसी क्रमवारीत आपले स्थान भक्कम करण्यासाठी टीम इंडियाला हा विजय खुप महत्त्वाचा आहे.

जसा विजय भारतासाठी अनेक गोष्टीसाठी महत्त्वाचा आहे तसेच होणाऱ्या अनेक विक्रमांसाठीही कायम इतिहासात लिहीला जाणार आहे.

असेच काही विक्रम, जे या सामन्यात होऊ शकतात-

१. कसोटीत जेम्स अॅंडसरनला सर्वाधिक विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज बनण्यासाठी ७ विकेट्सची गरज. त्याने १४१ कसोटीत ५५७ विकेट्स घेतल्या आहेत. तर ग्लेन मॅकॅग्राने १२४ कसोटीत ५६३ विकेट्स घेतल्या आहेत.

२. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजार धावा पुर्ण करणारा जगातील १५वा फलंदाज बनण्यासाठी विराटला केवळ १२५ धावांची गरज. त्याने ३४२ सामन्यात १७८७५ धावा केल्या आहेत.

३. कसोटीत विराटने ६९ सामन्यात २३ शतके केली आहेत. त्याला आता २३ शतकांचा स्टीव स्मिथ, विरेंद्र सेहवाग, केविन पीटरसन, जस्टीन लॅंगर आणि जावेद मियाॅंदाद यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

४. कसोटीत ६ हजार धावा करणारा जगातील ६६वा फलंदाज होण्यासाठी विराटला केवळ ६ धावांची गरज. विराटने ६९ कसोटीत ५४.४९च्या सरासरीने ५९९४ धावा केल्या आहेत.

५. इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्यासाठी विराटला १६३ धावांची गरज. सुनिल गावसकर यांनी एकाच मालिकेत इंग्लंडमध्ये ६०२ तर राहुल द्रविडने ५४२ धावा केल्या होत्या. सध्या विराट कोहलीने ३ सामन्यांत ४४० धावा केल्या असुन दोन सामने बाकी आहेत.

६. कसोटी क्रिकेटमध्ये २५० विकेट्स घेण्यासाठी इशांत शर्माला १ विकेटची गरज. त्याने ८४ कसोटीत २४९ विकेट्स घेतल्या आहेत.

७.अदिल राशिदला कसोटीत ५० विकेट्सचा टप्पा पार करण्याची संधी. त्याने १३ कसोटीत ४५ विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

 आफ्रिदीला ‘बूम-बूम’ हे फेमस टोपण नाव देणारा कोण होता तो भारतीय खेळाडू

लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे

-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?

-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड

-एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

-भारतीय संघासाठी ही आहे दिवसातील सर्वात मोठी गोड बातमी

 

You might also like