नेपाळ येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई स्पर्धेसाठी भारतीय कबड्डी पुरुष व महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. यास्पर्धेसाठी भारतीय संघ निवड शिबिर घेण्यात आले होते. रोहटक, हरियाना येथे ५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९ दरम्यान हे निवड शिबिर पार पडले. त्यातून भारतीय पुरुष व महिला संघ निवडला आहे.
भारतीय संघात १२-१२ खेळाडूंची निवड झाली आहे. पुरुष संघाच्या कर्णधारपदी दीपक निवास हुडाची वर्णी लागली आहे. तर महिला संघाची धुरा प्रियांकाकडे असणार आहे. शिबारात ४८ पुरुष व ४२ महिला खेळाडू सहभागी झाले होते.
भारतीय पुरुष संघात एकही महाराष्ट्राच्या खेळाडूंची निवड झाली नाही. तर महिला संघात दीपिका जोसेफ, स्नेहल शिंदे या महाराष्ट्र संघातील खेळाडूंची निवड झाली आहे. तर भारतीय रेल्वेकडून खेळणाऱ्या मराठमोळ्या सोनाली शिंगटेची भारतीय संघात निवड झाली आहे
नेपाळ येथे १ डिसेंबर ते १० डिसेंबर २०१९ दरम्यान दक्षिण आशियाई स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे. कबड्डी खेळाचे आयोजन ४ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२९ दरम्यान होईल. सदर स्पर्धेसाठी भारतीय संघ २८ नोव्हेंबर २०१९ रोजी दिल्ली येथून रवाना होईल.
असे आहेत भारतीय संघ –
पुरुष संघ:– दीपक निवास हूडा (कर्णधार), पवन शेरावत(उपकर्णधार), नितेश कुमार, विशाल भारद्वाज, सुनील कुमार, परवेश भाईंस्वाल, नवीन कुमार, प्रदीप नरवाल, अमित हुडा, सुरेंद्र नाडा, विकाश कंडोला, दर्शन कदिन
महिला संघ:– प्रियांका (कर्णधार), दीपिका हेन्री जोसेफ(उपकर्णधार), रितू नेगी, निशा, पुष्पा, साक्षी कुमारी, पायल चौधरी, रीतू नेगी, सोनाली विष्णू शिंगटे, सेन्हल प्रदीप शिंदे, ममता कुमारी ढाका, हरविंदर कौर




