---Advertisement---

मॉडर्न डे क्रिकेटमधील ‘सबसे बडा बॉलर’ बनला रबाडा

On: शुक्रवार, ऑगस्ट 19, 2022 11:28 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी लॉर्ड्स मैदानावर खेळली गेली. या सामन्यात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने यजमान इंग्लंडवर एक डाव आणि १२ धावांनी दणदणीत विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेच्या या ऐतिहासिक विजयाचा नायक अनुभवी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा ठरला. या सामन्यात संस्मरणीय कामगिरी करणाऱ्या रबाडाने एक मोठा विक्रम करत क्रिकेट इतिहासात आपले नाव नोंद केले.

मागील काही महिन्यांपासून विजयाच्या रथावर आरूढ असलेल्या इंग्लंड संघाला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले. त्यांच्या या विजयात अनुभवी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने सिंहाचा वाटा उचलला. पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात दोन बळी त्याने आपल्या नावे केले.

 

यादरम्यान रबाडाने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये २५० बळी पूर्ण केले. सर्वात वेगवान २५० कसोटी बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आला. त्याने ५३ कसोटीत ही कामगिरी केली. सर्वात वेगवान २५० कसोटी बळी घेण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाचे महान वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांच्या नावे आहे. त्यांनी ४८ कसोटीत ही कामगिरी केली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन (४९ कसोटी), पाकिस्तानचा वकार युनूस (५० कसोटी) व न्यूझीलंडचे रिचर्ड हेडली (५१ कसोटी) यांचा क्रमांक लागतो. २००० नंतर पदार्पण करणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत रबाडा मात्र अव्वल ठरला आहे.

सध्या २७ वर्षाच्या असलेल्या रबाडाने २०१५ मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.‌ त्याने ५३ कसोटीच्या ९७ डावात २५० बळी मिळवले आहेत. यादरम्यान त्याने ११२ धावा देत ७ बळी मिळवण्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---