ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात वनडे विश्वचषक रंगणार आहे. या विश्वाचषकाचा ज्वर चढू लागला असून, विविध आजी-माजी खेळाडू आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अशातच आपला पहिला विश्वचषक जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याने मोठी गर्जना केली आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ 1992 पासून विश्वचषकात सहभागी होत आहे. आतापर्यंत चार वेळा त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला असून, अंतिम फेरीत त्यांना एकदाही प्रवेश करता आला नाही. या कारणाने त्यांना चोकर्स असे देखील म्हटले जाते. मात्र, यावेळी आपला हा शिक्का पुसून काढण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे रबाडा यिने म्हटले. एका मुलाखतीत बोलताना तो म्हणाला,
“आगामी विश्वचषकासाठी माझ्यासह संपूर्ण संघ उत्साही आहे. हा विश्वचषक जिंकण्यासाठी आम्ही देखील दावेदार असू. आमच्या संघातील जवळपास सर्वच खेळाडू आयपीएलमध्ये अनेक वर्ष झाले खेळत आहेत. विश्वचषकातील सामने ज्या मैदानांवर होणार आहेत, त्या मैदानावर खेळण्याचा आम्ही पुरेसा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आम्हाला त्या अनुभवाचा फायदा करून घेत जिंकण्याची संधी असेल.”
यापूर्वी भारतीय उपखंडात झालेल्या 2011 वनडे विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीचा सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागलेला. यावेळी संघाचे नेतृत्व टेंबा बवुमा करताना दिसू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त संघात अनुभवी ऐडन मार्करम, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन, रायली रूसो हे फलंदाज असतील. त्या व्यतिरिक्त अष्टपैलू वेन पार्नेल व मार्को जेन्सन यांचा देखील संघात समावेश होण्याची शक्यता आहे. तर वेगवान गोलंदाजीचा भार रबाडासह एन्रिक नोर्कीए व ड्वेन प्रिटोरियस यांच्या खांद्यावर असण्याची शक्यता आहे. हे सर्व खेळाडू मागील काही वर्षांपासून सातत्याने आयपीएलमध्ये दिसून येतात.
(Kagiso Rabada Hoping South Africa Will Win 2023 ODI World Cup In India Due To IPL Experience)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: बीसीसीआयकडून नव्या निवडसमितीची घोषणा, यांच्या खांद्यावर दिली जबाबदारी
असलं चालणार नाही! बीसीसीआयने दाखवली पीसीबीच्या ‘त्या’ प्रस्तावाला केराची टोपली!