---Advertisement---

अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल

---Advertisement---

कागिसो रबाडा हा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज त्याच्या गोलंदाजीतील सातत्य आणि विविधतेमुळे ओळखला जातो. याचमुळे कमी दिवसांत जगातील मोठ्या गोलंदाजांत त्याचे नाव आदराने घेतले जाते.

याच रबाडाने परवा आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी२० सामन्यात एक विचित्र चेंडू टाकला. यामुळे रबाडासह फलंदाज, पंच आणि दक्षिण आफ्रिका संघातील काही खेळाडूही बुचकळ्यात पडले.

शनिवारी झालेल्या या सामन्यात त्याने हा चेंडू टाकला. यावेळी आॅस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल हा फलंदाजी करत होता.

९व्या षटकात गोलंदाजी करत असताना त्याच्या हातातून चेंडू सटकला. यामुळे हा चेंडू पिचपेक्षा बराच बाहेर पडला आणि अखेर फलंदाजाच्या हातात सापडला.

आॅस्ट्रेलिया दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ हा सामना जिंकत १ सामन्याची मालिका जिंकला. १० षटकांच्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ख्रीस माॅरिसच्या २ विकेटच्या जोरावर २१ धावांनी विजय मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या:

त्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!

असे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले!

महास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र

क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्मा सज्ज

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- मराठवाड्याचा सुपूत्र

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment