श्रीलंकेचा प्रतिभावान कमिंदू मेंडिसची कसोटी कारकीर्द नव्या दिशेने आगेकूच करत आहे. आता न्यूझीलंडविरुद्धच्या गॅले कसोटीत शतक झळकावून या 25 वर्षीय युवा खेळाडूने डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटच्या 13व्या डावातील हे त्याचे 5 वे शतक आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी डावात 5 शतके झळकावणाऱ्या दिग्गजांच्या यादीत मेंडिस आता डॉन ब्रॅडमनसोबत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 400 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 5 शतके झळकावण्याचा विश्वविक्रम वेस्ट इंडिजच्या एव्हर्टन वीक्सच्या नावावर आहे. ज्याने 1948 मध्ये 10 डावांमध्ये पहिली 5 शतके झळकावली होती. दुसऱ्या क्रमांकावर हर्बर्ट सटक्लिफ आणि नील हार्वे आहेत. ज्यांनी 12-12 डावांमध्ये ही कामगिरी केली. त्यानंतर आता कामिंदू मेंडिसने दिग्गज 13 डावात डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
5 कसोटी शतकांसाठी खेळलेले सर्वात कमी डाव
10 – एव्हर्टन विक्स
12 – हर्बर्ट सटक्लिफ
12 – नील हार्वे
13 – डॉन ब्रॅडमन
13 – जॉर्ज हेडली
13 – कामिंडू मेंडिस
KAMINDU MENDIS – A SUPERSTAR IN MAKING…!!!
– 5 Test centuries in just 8 matches. 🤯 pic.twitter.com/cXF8Gbentc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2024
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या श्रीलंकेच्या संघाने या बातमी आखेरपर्यंत गॅले कसोटीत 5 गडी गमावून 536 धावा केल्या आहेत. मेंडिस अजूनही क्रीजवर आहे. तो 146 धावांवर नाबाद खेळत आहे. 21 व्या शतकात गॅले हा श्रीलंकेचा गड राहिला आहे. येथे संघाने सर्वाधिक 25 सामने जिंकले आहेत. 21 व्या शतकातील एका मैदानावर कोणत्याही संघाने जिंकलेले हे एकत्रित सर्वाधिक सामने आहेत. या शतकात इंग्लंडने लॉर्ड्सवर तितकेच सामने जिंकले आहेत. गाले येथे 26 वा विजय नोंदवून इतिहास रचण्याकडे श्रीलंकेचे लक्ष असेल.
हेही वाचा-
भारतीय दिग्गजाचा मोठा विक्रम मोडीत; अश्विनची ऐतिहासिक कामगिरी
कानपूर कसोटीत राडा! बांगलादेशच्या चाहत्याला बेदम मारहाण, हिंसाचाराचा व्हिडिओ व्हायरल
हुबेहुबचं .! विराट कोहलीने केली बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल; VIDEO पाहाच