कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात शनिवारी पार पडलेला इंडियन प्रीमियर लीग २०२०चा आठवा सामना एका युवा गोलंदाजासाठी खूपच विशेष ठरला. कारण या सामन्यातून त्या गोलंदाजाने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा गोलंदाज २ वर्षांपुर्वी म्हणजे २०१८ साली कोलकाता संघात सामाविष्ट झाला होता. परंतु दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू शकला नाही. पण अखेर शनिवारी (२६ सप्टेंबर) तो दिवस उजाडला आणि त्याचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाले. हा गोलंदाज म्हणजे, ‘कमलेश नागरकोटी’. Kamlesh Nagarkoti IPL Debut Against Sunrisers Hydrabad
२० वर्षीय वेगवान गोलंदाज नागरकोटीला आयपीएल २०१८ लिलावात कोलकाता संघाने तब्बल ३.२० कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण आयपीएल सामना खेळण्यापुर्वीच त्याच्या घोट्याला दुखापत झाली. त्यामुळे २०१८ साली तो आयपीएल खेळू शकला नाही. तर २०१९मध्येही त्याला झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे तो या स्पर्धेतून बाहेर राहिला.
दरम्यान तो बेंगलोरमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी गेला होता. तिथे नागरकोटीवर उपचार चालू असताना त्याचे मित्र शुबमन गिल, अभिषेक शर्मा हे कोलकाता संघाकडून आयपीएलमध्ये खेळत होते. त्यामुळे नागरकोटीच्या मनात खूप नकारात्मक भावना निर्माण झाल्या होत्या. तो त्यांना खेळताना पाहून रडत बसायचा. पण एकदा दिग्गज भारतीय खेळाडू राहुल द्रविडने त्याला रडताना पाहिले आणि पुढे त्याने नागरकोटीची समजूत काढली.
याविषयी एका मुलाखतीमध्ये बोलताना नागरकोटीने म्हटले होते की, “राहुल द्रविडने मला सांगितले होते की एक किंवा दोन आयपीएल हंगाम न खेळणे ही खूप मोठी गोष्ट नसते. कारण तुम्हाला भविष्यात भारतीय संघाकडून खेळायचे असते.”
द्रविडच्या या वक्तव्यामुळे नागरकोटीला धीर मिळाला आणि नंतर या २० वर्षीय गोलंदाजाने मागे वळून पाहिले नाही. जवळपास १९ महिने क्रिकेटपासून दूर राहिलेला नागरकोटी पुढे द्रविडच्या देखरेखीखाली तंदुरुस्त झाला आणि अखेर काल त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात नागरकोटीला एकही विकेट घेता आली नाही. त्याने २ षटके टाकत १७ धावा दिल्या.
असे असले तरी, देशांतर्गत क्रिकेटमधील राजस्थान संघाकडून खेळताना नागरकोटीने चांगली कामगिरी केली आहे. त्याने ९ अ दर्जाचे सामने खेळत ११ विकेट्स आणि १३१ धावांची नोंद आपल्या खात्यात केली आहे. तर २०१८ साली न्यूझीलंडमध्ये खेळण्यात आलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारतीय संघाकडून ६ सामने खेळत त्याने ९ विकेट्स चटकावल्या होत्या. शिवाय तो १५० किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता राखतो. यापुढील आयपीएल सामन्यात तो नक्कीच आपली कमाल दाखवून देण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL आजचा सामना : हंगामातील दुस-या विजयासाठी पंजाब आणि राजस्थानमध्ये होणार लढत, पाहा संभाव्य संघ
धक्कादायक! मेघालयातील भूस्खलनात दोन महिला क्रिकेटपटूंचा दुर्दैवी अंत
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये ‘या’ संघांनी केल्यात सर्वाधिक वेळा २०० धावा
स्टार खेळाडूंचा होता भरणा, तरीही ‘या’ ५ कारणांमुळे हैदराबाद झाली चारीमुंड्या चीत
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १६- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’