युगांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. युगांडाचा बराचसा भाग व्हिक्टोरिया सरोवराने व्यापला आहे. कंपाला (Kampala) ही आफ्रिकेतील युगांडा ह्या देशाची राजधानी आहे. कंपालाच्या एकूण लोकसंख्येपैकी अंदाजे 60 टक्के लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहते आणि युगांडाचा वेगवान गोलंदाज जुमा मियागी या गरीब भागात झोपडपट्ट्यांमधून आपले करिअरला सुरुवात केले आहे. या झोपडपट्ट्यांमध्ये आजही तेथील लोक मूलभूत गरजांपासून वंचित आहेत. अशा परिस्थितीतून जुमा मियागीने गगन भरारी घेत आज टी 20 विश्वचषकात देशासाठी प्रतिनिधित्व करत आहे.
21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34 विकेट घेणारा मियागी झोपडपट्टीत वाढलाआहे. आजही आपल्या कुटुंबासह तिथेच राहत आहे. सायमन सेसाझी आणि ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह इनोसंट म्वेबेझसह इतर टी20 विश्वचषक संघातील खेळाडूंचीही हीच स्थिती आहे. ते अशा भागात वाढले आहेत जिथे स्वच्छ पाणी, सांडपाणी व्यवस्था नाही.
झोपडपट्टी पासून ते टी 20 विश्वचषक जुमा मियागीला हा प्रवास खूप प्रेरणादायी ठरणार आहे. त्याने सुरुवातीस 19 वर्ष्या खालील कॅरिबियन संघात प्रतिनिधित्व केल्यानंतर दोन वर्षांनी आज आयसीसीच्या युगांडा संघाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळणार आहे. युगांडा मागील नोव्हेंबरमध्येआपल्या पहिल्या आयसीसी टी 20 विश्वचषकासाठी पात्र ठरला होता.
युगाडांच्या या संघर्षदायी प्रवासाच्या संघाची मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी भारतीय अभय शर्मा यांनी घेतली आहे. शर्मा या झोपडपट्ट्यांना पूर्णपणे अपरिचीत नाहीत असं नाही कारण मुंबई येथील धारावी झोपडपट्टी त्यांनी पाहिली आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर खेळाडूंसोबत वेळ घालवल्यामुळे शर्मा यांचा खेळाडूंबद्दलचा आदर अनेक पटींनी वाढला आहे.
एकूणच या युगाडांच्या खेळाडूंच्या संघर्षमयी प्रवासाला “मेहनत रंग लायी” असं म्हंटलेतर वावगं ठरणार नाही. तर आगामी टी 20 विश्वचषकात युगांडाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध 4 जून रोजी होणार आहे.
महत्तवाच्या बातम्या
पाकिस्तानचा 7 विकेट्सनं दारुण पराभव, इंग्लंडनं टी20 मालिकेवर गाजवले वर्चस्व
‘आता नाही तर कधीच नाही’ या तीन भारतीय खेळाडूंना टी20 विश्वचषक जिंकण्याची शेवटची संधी!
टी20 विश्वचषकाआधीच सुर्यकुमार यादवनं केलं, यशस्वी जयस्वालला सावधान!