पाकिस्तान संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमल (kamran akmal) याने गौतम गंभीर (gautam gambhir) सोबत त्याचा कसल्याही प्रकराचा वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. अकमल आणि गंभीर यांच्यात २०१० आशिया चषकातील (2010 ashia cup) एका सामन्यात वाद झाला होता. त्याच वादावर अकमलनेने आता स्पष्टीकरण दिले आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे गंभीरसोबत त्याचा कसलाच वाद नाहीय आणि दोघे चांगले मित्र आहेत. अकमलने यावेळी भारताच्या इतरही खेळाडूंचे कौतुक केले.
नुकत्याच पार पडलेल्या लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत कामरान अकमल एशिया लायन्स संघाचा भाग होता. लिजेंड्स लीग क्रिकेटच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला गेला आहे, ज्यामध्ये कामरान गंभीरसोबत झालेल्या वादाविषयी बोलत आहे. तो म्हणाला की, गंभीरसोबत मतभेद असू शकतात, पण दोघांमध्ये वाद नाहीय. त्याने सांगितले की, आम्ही दोघांनी ए संघासोबत अनेक सामने एकत्र खेळले आहेत. ईशांत शर्मासोबत देखील त्याचा कसलाच वाद नसल्याचे तो म्हणाला.
ईशांत शर्मा आणि अकमल यांच्यात २०१२-१३ साली बेंगलोरमध्ये झालेल्या टी२० सामन्यात वाद झाला होता. मात्र, अकमलने याविषयी भूमिका स्पष्ट करत सांगितले की, भारतीय खेळाडूंसोबत त्याचे संबंध खूप चांगले आहेत. तो म्हणाला, “गंभीरसोबत २०१० आशिया चषकात वातावरण थोडे गरम झाले होते, पण तो गैरसमज होता. तो एक खूप चांगला व्यक्ती आहे, चांगला मित्र आहे. आम्ही ए संघासोबत एकत्र क्रिकेट खेळले आहे. ईशांत शर्मासोबतही काहीच वाद नाहीय.”
https://www.instagram.com/tv/CZUCNmBhYn4/?utm_source=ig_web_copy_link
अकमलला यावेळी मुलाखतील इतरही प्रश्न विचारले गेले. इरफान पठाण आणि जहीर खान यांच्यातील उत्तम वेगवान गोलंदाज कोण ? या प्रश्नाचे उत्तर देताना अकमलने एका क्षणात जहीर खानचे नाव घेतले. अकमलच्या मते, जहीर खान जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. सोबतच त्याने एमएस धोनीला मागच्या १० ते १५ वर्षातील सर्वोत्तम यष्टीरक्षक सांगितले आहे.
दरम्यान, शनिवारी (२९ जानेवारी) लिजेंड्स लीग क्रिकेटचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात अशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स संघ आमने सामने होते. या सामन्यात वर्ल्ड जायंट्सने २५ धावांनी विजय मिळवला आणि स्पर्धेचा पहिला विजेता संघ बनला.
महत्वाच्या बातम्या –
‘या’ आहेत आयपीएल संघांच्या सर्वात सुंदर मालकिणी; कोणी अभिनेत्री तर कोणी…
‘यंग इंडिया’च्या यशाचा ‘हा’ आहे सूत्रधार! कर्णधार यश धूलने केला खुलासा
चेंडू स्टंप्सला लागूनही फलंदाज नाबाद, हसत उडवली भारतीय संघाची खिल्ली; पण पुढे झाला क्लिन बोल्ड
व्हिडिओ पाहा –