रविवार (दि. २९ मे) हा दिवस भारतीय क्रिकेटप्रेमींसोबत सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. यामागील कारणही तसंच आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा अंतिम सामना रविवारी खेळला जाणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला जात आहे. राजस्थान संघ तब्बल १४ वर्षांनंतर अंतिम सामन्यात पोहोचला आहे. अशात हा इतका मोठा दुष्काळ विजेतेपद पटकावत संपवण्याचा संघाचा प्रयत्न राहील. राजस्थानने २००८मध्ये पहिले वहिले आयपीएलचे किताब पटकावले होते. आता त्याच संघाचा भाग राहिलेला पाकिस्तानी खेळाडू कामरान अकमल याने राजस्थान संघासाठी खास संदेश पाठवला आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू कामरान अकमल (Kamran Akmal) याने ट्वीट करत लिहिले की, “राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला अंतिम सामन्यात पाहून खूप आनंद झाला. राजस्थानचे चाहते आणि संघ व्यवस्थापनाला शुभेच्छा. राजस्थान आणि गुजरात संघालाही शुभेच्छा. कारण, मी राजस्थानचा भाग होतो. त्यामुळे मला वाटते की, राजस्थाननेच अंतिम सामना जिंकावा.”
आयपीएल २००८च्या (IPL 2008) पहिल्या हंगामात पाकिस्तानी खेळाडूंनी देखील भाग घेतला होता. शेन वॉर्नच्या (Shane Warne) नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. संघामध्ये कामरान अकमल, सोहेल तन्वीरसारखे पाकिस्तानी खेळाडूही होते. सोहेल तन्वीर पहिल्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता.
आयपीएल २०२२बद्दल बोलायचे झाले, तर गुजरातने १४ सामने खेळत त्यातील १० सामन्यात विजय मिळवत प्लेऑफचे सर्वप्रथम तिकीट मिळवले होते. त्यानंतर पहिल्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत करत गुजरातने अंतिम सामन्यात धडक दिली. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने चांगली कामगिरी केली आहे. जोस बटलरने या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच, ऑरेंज कॅपही त्याच्याच नावावर आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नरेंद्र मोदी स्टेडियम | सर्वाधिक प्रेक्षकांची व्यवस्था तर आहेच, पण मैदानाच्या ‘या’ बाबी आहेत विशेष
आयपीएलच्या फायनल आधीच चहलच्या पत्नीने लावला ठुमका, ‘जिगल जिगल’ गाण्यावरील व्हिडिओने लुटली वाहवा!
IPL 2022। हार्दिकची ‘ही’ आकडेवारी देतेय गुजरातच्या विजेतेपदाची ग्वाही, पाहा नक्की काय आहे विक्रम