सध्या इंग्लंडचा पाकिस्तान दौरा सुरू आहे. दोन्ही संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ मुल्तान क्रिकेट मैदानावर आमने-सामने आहेत. या सामन्यात पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझमच्या (Babar Azam) जागी निवड समितीने विश्वास दाखवत कामरान गुलामची (Kamran Ghulam) संघात निवड केली होती. तर पदार्पण सामन्यातच कामरान गुलामने शानदार शतकी खेळी केली.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. संघ अडचणीत असताना कामरान गुलामने (Kamran Ghulam) सॅम अयुबसह डावाची धुरा सांभाळली. दोन्ही फलंदाजांनी 149 धावांची भागीदारी रचत पाकिस्तानला गेममध्ये परत आणले. सॅम अयुब 77 धावांची शानदार खेळी करून बाद झाला.
पण कामरान गुलामने (Kamran Ghulam) आपला पदार्पण सामना खेळताना शानदार फलंदाजी करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने 224 चेंडूंचा सामना करताना 11 चौकारांसह 1 षटकार ठोकला. गुलामच्या या खेळीमुळे बाबर आझमसाठी (Babar Azam) पुनरागमनाचा मार्ग कठीण होण्याची शक्यता आहे.
गुलामने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पदार्पणाच्या सामन्यात धमाकेदार शतक झळकावले आणि अशी कामगिरी करणारा तो पाकिस्तानचा दुसरा फलंदाज ठरला. यााधी सलीम मलिकने 1982 मध्ये पदार्पणाच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध नाबाद 100 धावा ठोकल्या होत्या. तब्बल 42 वर्षांनंतर गुलामने पाकिस्तानविरुद्ध ही कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबत कर्णधाराचे मोठे अपडेट, AUS दौऱ्यातूनही बाहेर?
IND VS NZ; कसोटीच्या रणसंग्रमाला उद्यापासून सुरुवात, हाॅटस्टार नाही तर या ठिकाणी पाहा लाईव्ह सामना
न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान जाणूनबुजून हरला? 1-2 नव्हे तर चक्क इतक्या कॅच सोडल्या