---Advertisement---

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी२०आधी ऑस्ट्रेलिया संघाला बसला मोठा धक्का

On: बुधवार, फेब्रुवारी 27, 2019 5:18 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(27 फेब्रुवारी) दुसरा टी20 सामना बंगळूरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडीयममध्ये होणार आहे. तसेच या सामन्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 2 मार्चपासून 5 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.

मात्र त्याआधीच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनला दुखापतीमुळे भारत दौऱ्यातूनच बाहेर पडावे आहे. याबद्दल आज(27 फेब्रुवारी) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माहिती दिली आहे.

त्याला रविवारी विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या टी20 सामन्याआधी झालेल्या सराव सत्रावेळी काही वेदना होत होत्या. तो हा सामना खेळला नव्हता.

याबद्दल ऑस्ट्रेलिया संघाचे फिजिओथेरपिस्ट डेव्हिड बेकली म्हणाले, ‘पहिल्या टी20 सामन्याआधी सरावावेळी केनच्या डाव्या वाजूला वेदना होत होती. पण दुर्दैवाने तो यातून पुर्ण बरा न झाल्याने भारत दौऱ्यातील पुढील सामन्यात भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे तो पुन्हा मायदेशी परतेल. आम्ही त्याच्या प्रगतीकडे येत्या आठवड्यात लक्ष ठेऊ.’

ऑस्ट्रेलियाच्या या उर्वरित भारत दौऱ्यासाठी केनच्या ऐवजी अँड्र्यू टायची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

केनने ऑस्ट्रेलियाकडून आत्तापर्यंत 9 टी20 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आज होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात या खास विक्रमांवर असेल नजर

इतिहास घडविण्यापासून जसप्रीत बुमराह केवळ २ विकेट दूर

दोन बदलांसह अशी असु शकते दुसऱ्या टी२० सामन्यासाठी टीम इंडिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment