---Advertisement---

दिग्गज कर्णधार आयपीएलमध्ये अनसोल्ड, आता करणार समालोचकाचे काम

Kane-Williamson
---Advertisement---

आयपीएल इतिहासतील दिग्गज कर्णधारांपैकी एक असलेला केन विल्यमसन आता स्पर्धेच्या या हंगामात काॅमेंट्री करणार आहे. मेगा लिलावात कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नाही. त्यामुळे आता केन विल्यमसन नव्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे, आयपीएल 2025 साठी तो समालोचक आणि क्रिकेट तज्ज्ञ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. स्टार स्पोर्ट्सच्या राष्ट्रीय समालोचन पॅनेलमध्ये तो सहभागी होणार आहे.

आयपीएल 2025 च्या हंगामाची सुरुवात आज 22 मार्च रोजी कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणार असून, गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्घाटन सामना रंगणार आहे.

केन विल्यमसन हा आयपीएलचा अनुभवी खेळाडू आहे. तो 2015 ते 2022 दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग होता. 2016 मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने जेव्हा आयपीएलचे विजेतेपद पटकावले, तेव्हा विल्यमसनचा मोठा वाटा होता. 2022 मध्ये तो हैदाबादचा कर्णधार होता, मात्र त्यानंतर संघाने त्याला सोडले. 2023 मध्ये गुजरात टायटन्सने त्याला विकत घेतले, परंतु पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागली आणि तो संपूर्ण हंगामातून बाहेर पडला.

आयपीएल कारकिर्दीत केन विल्यमसनने 79 सामने खेळून 2128 धावा केल्या असून त्याचे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या 84 आहे. त्याने 18 अर्धशतके झळकावली असली तरी एकही शतक झळकावू शकला नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---