---Advertisement---

गुणतालिकेत तळाशी असलेल्या हैदराबादचा पुन्हा ‘सनसेट’, हताश कर्णधाराने ‘यांच्या’वर फोडले खापर

On: गुरूवार, सप्टेंबर 23, 2021 10:39 AM
kane-williamson
---Advertisement---

आयपीएल २०२१च्या पहिल्या टप्प्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने खूप खराब प्रदर्शन केले होते. आता दुसऱ्या टप्प्यातही त्यांना पहिल्या सामन्यातच पराभवाचा सामना करावा लागला आहे. हंगामाच्या ३३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला ८ विकेट्स राखून पराभूत केले आहे. या सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याच्या मते संघातील गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले; मात्र फलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.

हैदराबादचा माजी कर्णधार डेविड वार्नर सामन्याच्या पहिल्या षटकातच शून्य धावांवर बाद झाला. याच पार्श्वभूमीवर कर्णधार केन विलियम्सनने सामना संपल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “आम्ही सुरुवात चांगली केली नाही, एक चांगली भागीदारी केली नाही. शेवटी काही महत्त्वपूर्ण धावा बनल्या, पण आम्ही कमीत कमी २०-३० धावा मागे राहिलो. आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही याआधी अनेक वेळा छोट्या आव्हानाचा बचाव केला आहे, पण आज ते करू शकलो नाही. आमचा आतापर्यंतचा प्रवास खूप अडचणींचा राहिला आहे.”

“दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रदर्शन अप्रतिम होते. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू होते आणि त्यांनी आमच्यावर दबाव टाकला. ते आम्हाला अवघड परिस्थितीमध्ये घेऊन गेले. जर आम्ही सुरुवातीच्या विकेट्स लवकर गमावल्या नसत्या तर स्थिती काही वेगळी असती. मात्र, दिल्ली कॅपिटल्सने अप्रतिम आणि स्मार्ट क्रिकेट खेळले,” असेही विलियम्सन म्हणाला.

सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर वॉर्नर सामन्याच्या पहिल्याच षटकात शून्य धावांवर तंबूत परतला आणि त्यानंतर संघाचे संतुलन बिघडले. त्यानंतर संघाचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले. सामन्यात वृद्धिमान साहा (१८), केन विलियम्सन (१८), मनीष पांडे (१७) आणि केदार जाधव (३) हे खेळाडूही संघासाठी मोठी खेळी करू शकले नाहीत.

सनरायझर्स हैदराबाचे पहिल्या टप्प्यातील प्रदर्शन खूपच खराब राहीले असून यामध्ये संघाने ७ पैकी केवळ १ सामना जिंकला होता. तसेच दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामनाही संघाने गमावला आहे. या खराब प्ररदर्शनाच्या पार्श्वभूमीवर संघ गुणतालिकेत ८ पैकी केवळ १ सामना जिंकत आणि २ गुणांसह तळाशी आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अरे किती घाई! स्टंपिगच्या गडबडीत पंतकडून सुटला विलियम्सनचा झेल, गोलंदाज अश्विननं मुरडलं नाक

लाईव्ह सामन्यात ‘तिला’ पाहून दर्शकांची खुलली कळी; म्हणाले, ‘सनरायझर्सला सपोर्ट करण्याचं एकमेव कारण’!

टी२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका, ‘हा’ धाकड अष्टपैलू जायबंदी; आयपीएलदरम्यान झाली दुखापत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---