आयसीसी वनडे विश्वचषक 2023 भारतात खेळला जात आहे. अशातच न्यूझीलंड संघासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडचा दिग्गज केन विलियम्सन शुक्रवारी (13 ऑक्टोबर) संघात पुनरागमन करू शकतो. दुकापतीतून सावल्याचे सांगत त्याला विश्वचषक संघात निवडले गेले. मात्र, फिटनेसच्या कारणास्तव कर्णधार प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर होता.
वनडे विश्वचषक 2023 (Kane Williamson) मध्ये न्यूझीलंड संघ सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला असून गुणतालिकेत पहिला क्रमांक देखील पटकावला. न्यूझीलंडला शुक्रवारी (13 ऑक्टोबर) विश्वचषकातील आपला तिसरा सामना खेळायचा आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा अनुभवी कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) मोठ्या काळानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. क्रिकबजच्या माहितीनसार केन विलियम्सनने स्वतः याविषयी पुष्टी केली आहे की, शुक्रवारी तो बांगलादेशविरुद्धचा सामना खेळताना दिसेल.
दरम्यान, मार्च 2023 नंतर विलियम्सन एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करणाऱ्या विलियम्सनला श्रेत्ररक्षण करताना दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्या दुखापतीवर मोठी शस्त्रक्रिया देखील पार पडली. दरम्यानच्या पाच महिन्यांमध्ये त्याने फिटनेसवर जोरदार काम केले. विश्वचषकाआधी त्याने न्यूझीलंडसाठी दोन सराव सामने खेळले आहेत.
पाकिस्तानविरुद्धच्या (29 सप्टेंबर) सराव सामन्यात त्याने 54* धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 37 धावांवर बाद झाला होता. असे असले तरी खरबरादाची उपाय म्हणून न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापनाने विश्वचषकातीत पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला खेळवण्याची जोखीम घेतली नाही. 5 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यातने विश्वचषकाचा प्रारंभ झाला. मागच्या आठ दिवसांमध्ये त्याने संघासोबत प्रवास केला आणि फिटनेसवर काम देखील केले.
तत्पूर्वी विलियम्सनच्या नेतृत्वात न्यूझीलंड मागच्या विश्वचषकात (2019) उपविजेता संघ ठरला होता. यावर्षी देखील कर्णधार आपल्या संघाला ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी संर्वकाही पणाला लावू शकतो. शुक्रवारी विलियम्सन एकमेवर कर्णधार ठरू शकतो, जे 2019 विश्वचषक आणि 2023 विश्वचषकात आपल्या संघाचे नेतृत्व करेल. 2019 विश्वचषकातील इतर सर्व कर्णधारांपैकी काहींनी निवृत्ती घेतली आहे, तर काहींनी कर्णधारपद सोडले आहे. (Kane Williamson can play in New Zealand’s third World Cup match 2023)
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या विश्वचषकातील कामगिरीवर ‘क्रिकेटचा देव’ भलताच खुश; म्हणाला, ’14 ऑक्टोबरची…’
मोठी बातमी! ‘या’ दौऱ्यासाठी पाकिस्तान संघ जाहीर, वर्षभरानंतर अनुभवी खेळाडूचे पुनरागमन