कराची येथे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान वर्षातील अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या या खेळपट्टीवर तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने वर्चस्व गाजवत नाममात्र आघाडी मिळवली. न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विलियम्सन याने झळकावलेले नाबाद शतक तिसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य राहिले.
इंग्लंडकडून मिळालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान संघ ही मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी पाकिस्तानने शानदार फलंदाजी करत धावफलकावर 438 धावा लावल्या. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचे 161 व आगा सलमानने 103 धावांची खेळी केली होती. न्यूझीलंडचा कर्णधार टीम साऊदी याने सर्वाधिक तीन बळी आपल्या नावे केले. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या दोन्ही सलामीवीरांनी दुसऱ्या दिवशी जबरदस्त खेळ दाखवला.
The first Test in Karachi is evenly poised going into day four 👀#PAKvNZ | #WTC23 | 📝 https://t.co/HdzZd87PUv pic.twitter.com/oSL1guahCl
— ICC (@ICC) December 28, 2022
डेवॉन कॉनवे व टॉम लॅथम यांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना न्यूझीलंडला बिनबाद 165 अशी मजल मारून दिलेली. दुसऱ्या दिवशी 182 धावांवर त्यांना पहिला धक्का बसला. कॉनवे 92 धावांवर पायचित होऊन तंबूत परतला. दुसरीकडे लॅथम याने आपले शतक पूर्ण केले. त्याने 113 धावांची खेळी केली.
कर्णधारपद सोडल्यानंतर आपला पहिलाच सामना खेळत असलेल्या केन विलियम्सन याची सुरुवात आश्वासक नव्हती. त्याला 21 धावांवर यष्टिचितच्या रूपाने सोपे जीवदान मिळाले. या जीवनाचा फायदा त्याने घेतला. दिवसाखेर टिच्चून फलंदाजी करताना त्याने आपले 25 वे शतक पूर्ण केले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडच्या 6 बाद 440 धावा झालेल्या. विलियम्सन नाबाद 105 धावांवर मैदानात उभा होता.
केन विलियम्सन याने आपले हे शतक तब्बल 722 दिवसानंतर पूर्ण केले आहे. मागील काही दिवसांपासून शतकांच्या प्रतिक्षेत असलेल्या स्टीव्ह स्मिथ, चेतेश्वर पुजारा व डेव्हिड वॉर्नर यांनीही आपले शतके झळकावली आहेत.
(Kane Williamson Century Help Newzealand To Take Lead In Karachi Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धचा पराभव जिव्हारी! बांगलादेशच्या हेड कोचने दिला राजीनामा
भारताचे कसोटी स्टार आयसीसी क्रमवारीत चमकले, अय्यरने घेतली 10 स्थानांची झेप