केन विलियम्सन याच्या ताबडतोड खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकन संघाला पराभूत केले. पराभवानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी श्रीलंका संघ अपात्र ठरला. न्यूझीलंडने मिळवलेला हा विजय मुळीच सोपा नव्हता, पण विलियन्सनने अखेरच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करून विजय मिळवलाच. शेवटच्या चेंडूवर विलियन्सन धावबाद होता होता राहिला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
न्यूझीलंड आणि श्रीलंका (Sri Lanka vs New Zealand ) यांच्यात पहिल्या कसोटीदरम्यान ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली. पाचव्या दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंडला विजयासाठी 1 धाव आवश्यक होती. यावेळी केन विलियम्सन (Kane Williamson) खेळपट्टीवर होता. असिथा फर्नांडो (Asitha Fernando) या षटकात गोलंदाजीला आला असून शेवटचा चेंडू त्याने बाउंस टाकला. विलियम्सनने हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू बॅटला लागला नाही हे समजताच विलियम्सन एक धाव घेण्यासाठी धावत सुटला. यष्टीरक्षक निरोशन डिकवेला याने हा चेंडू हातात आल्यानंतर क्षणाचा विलंब न करता थेड स्टंप्सवर फेकून मारला. पण चेंडू स्टंप्सल लागला नाही आणि गोलंदाजाच्या हातात आला.
गोलंदाज फर्नांडोने देखील चेंडू हातात आल्यानंतर तत्काळ नॉन स्ट्राईक एंडवर फेकून मारला. यावेळी चेंडू स्टंप्सला लागला आणि पंचांनी निकाल जाहीर करण्याआदी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. तिसऱ्या पंचांनी रिव्यू पाहिल्यानंतर चेंडू विलियम्सन चेंडू स्टंप्सला लागण्याआधी स्ट्राईच्या आतमध्ये पोहोचल्याचे दिसले. परिणामी तिसऱ्या पंचांनी नाबाद करार दिला आणि न्यूझीलंडने विजय मिळवला. केन विलियन्सनने या सामन्यातील दुसऱ्या डावात 194 चेंडूत खेळून नाबाद 121 धावा केल्या. यात 11 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. कसोटी कारकिर्दीतील विलियम्सनने चे 27वे, तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 40वे शतक ठरले
The winning moment of New Zealand.
What a finish, Test cricket, you beauty. https://t.co/M82BU8nxW0
— Johns. (@CricCrazyJohns) March 13, 2023
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीच विचार केला, तर पहिल्या डावात श्रीलंका संघाने 355, तर न्यूझीलंडने 375 धावा केल्या. प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात श्रीलंकन संघाने 302, तर न्यूझीलंडने 258 धावा करत विजय मिळवला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवर या सामन्याचा मोठी परिणाम झाला. श्रीलंतीय संघ अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे. पण या कसोटी सामन्याच्या निकाल लागण्याआधीच भारताने डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात जागा पक्की केली.
https://www.instagram.com/p/CpuD1YYM58s/?utm_source=ig_web_copy_link
श्रीलंकन संघाने न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले असते आणि भारताला अहमदाबाद कसोटीत विजय मिळला नसता, तर श्रीलंका देखील डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकत होता. पण पराभवानंतर श्रीलंकेचे अंतिम सामन्याचे स्वप्न देखील अपूर्ण राहिले. 7 जून रोजी लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळला जाईल.
(Kane Williamson gave New Zealand the win on the last ball)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेल्वे स्टेशनवरून स्टोक्सचे महत्वाचे सामान चोरीला, इंग्लिश कर्णधार म्हणतोय…
भारत खेळणार WTC फायनल, अहमदाबाद कसोटीचा निकाल लागण्याआधीच अंतिम सामन्यात धडक