न्यूझीलंड क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सन हा गंभीर दुखापतीनंतर वेगाने रिकव्हर होताना दिसत आहे. आगामी वनडे विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात आयोजित केला गेला आहे. अशात विलियम्सनची दुखापत न्यूझीलंड संघासाठी चिंतेची बाब ठरत आहे. असे असले तरी विश्वचषकात विलियम्सन खेळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, यासाठी त्याला पुढील दोन आठवड्यांमध्ये आपली तंदुरुस्ती सिद्ध करावी लागेल.
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये केन विलियम्सन (Kane Williamson) गुजरात टायटन्स (Hardik Pandya) संघाचा भाग होता. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वातील संघाने हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळला. या पहिल्याच सामन्या विलियम्सन सीमारेषेजवळ झेल पकडताना दुखापतग्रस्त झाला. विलियम्सनची दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला दीर्घ काळ संघातून बाहेर रहावे लागले.
काही दिवसांपूर्वी त्याने सरावाला सुरुवात केली असून, तो न्यूझीलंड संघात सामील देखील झाला आहे. तो अद्याप मॅच फिट नसला तरी, आता मी वनडे विश्वचषकापर्यंत तो पूर्ण फिट होण्याची शक्यता आहे. पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी आता त्याला बोर्डाकडून दोन आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. विश्वचषकासाठी प्राथमिक संघ घोषित करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर असून, विश्वचषकासाठीचा अंतिम संघ 27 सप्टेंबर पर्यंत घोषित करावा लागेल.
न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, “अजून गोष्टी ठीक होत आहेत. कदाचित तोच विश्वचषकासाठी संघात असेलही किंवा नसेलही. मात्र, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास तो आम्हाला विश्वचषकात हवाच आहे. कदाचित काही सांगण्यात आम्ही त्याला बाकावर बसवू. मात्र, तो नक्कीच संघाची ताकद आहे.”
विलियम्सन याने ज्या वेगाने या दुखापतीवर मात केली आहे ते पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच त्याचे कौतुक देखील होत आहे.
(Kane Williamson has 2 weeks to prove his fitness for the 2023 World Cup)
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र! ऑस्ट्रेलियाच झालं अवघड काम, विश्वचषकापूर्वीच मॅक्सवेलला झाली दुखापत
सच्चा देशप्रेमी! तिरंग्यावर स्वाक्षरी करण्यास नकार देत नीरजने दाखवली देशभक्ती






