हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रविवारी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने पुरुष भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ऍथलिट ठरला आहे. त्याचवेळी त्याने स्पर्धेनंतर अशी एक कृती केली त्यामुळे त्याने सर्वांची मने जिंकली.
This is Neeraj Chopra, Olympic Gold Medalist.
After winning the #WorldAthleticsChamps in Budapest yesterday, A hungarian fan came to him with an Indian flag and asked him to sign it for her.
Subedar Neeraj Chopra humbly denied and said “ Sorry Mam, it is a violation of my flag… pic.twitter.com/mc7afI6h4e
— Roshan Rai (@RoshanKrRaii) August 28, 2023
सुवर्णपदकाचा दावेदार म्हणून नीरज या स्पर्धेत सहभागी झाला होता. आपल्या पहिल्या फेकीमध्ये त्याचा फाऊल झाला. मात्र, दुसऱ्या फेकीमध्ये त्याने 88.17 मीटर इतका लांब भाला फेकत आघाडी घेतली. अखेर 6 फेरीपर्यंत त्याने ही आघाडी टिकवून ठेवत सुवर्ण आपल्या नावे केले. मागील वेळी तो या स्पर्धेत उपविजेता ठरला होता.
बक्षीस वितरणानंतर नीरज हा लॉबीमध्ये असताना एक हंगेरीयन स्त्री त्याची स्वाक्षरी घेण्यास आली. ती स्त्री उत्तम हिंदी बोलणारी होती. तिने नीरजसमोर भारतीय झेंडा धरत स्वाक्षरीची मागणी केली. यावर नीरजने तिला विनम्रपणे उत्तर दिले की ,” नही, वहा साईन नही कर सकता” त्यानंतर त्याने त्या महिलेच्या टी-शर्टच्या बाहीवर आपली स्वाक्षरी केली. त्याच्या या कृतीमुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
नीरज हा भारताचा वर्ल्ड ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला ऍथलिट आहे. मागील वेळी त्याने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले. मात्र, आता ऑलिंपिक सुवर्ण व जागतिक विजेता अशी दोन्ही पदके त्याच्याकडे आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक आपल्या नावे केलेले. ऍथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक होते.
(Neeraj Chopra Show Patriotism Denied To Sign On Indian Flag After Winning Gold Medal)
महत्वाच्या बातम्या –
‘तो माझ्या नेतृत्वातही खेळला आहे…’, माजी सलामीवीराने वनडेत सूर्यकुमारसाठी सुचवली खास बॅटिंग पोझिशन
BREAKING: स्मृतीची सदर्न ब्रेव्हज बनली ‘द हंड्रेड’ची चॅम्पियन, सुपरचार्जर्सच्या पदरी निराशा