न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विलियम्सन याने सोमवारी (27 फेब्रुवारी) एका मोठ्या विक्रमाची नोंद केली. विलियम्सनने न्यूझीलंड संघासाठी सर्वात जास्त कसोटी धावा केल्या असून माजी दिग्गज रॉस टेलर याला मागे टाकले आहे. थोडक्यात सांगायेच, तर भारतीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याची जी जागा आहे, तीच जागा आणि विलियम्सनने न्यूझीलंड क्रिकेटमध्ये मिळवली आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात विलियम्सनने हा विक्रम नावावर केला.
सध्या इंग्लंड संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिला सामना पाहुण्या संघाने जिंकल्यामुळे न्यूझीलंड संध्या 0-1 अशा फरकाने मागे आहे. मालिकेतील दुसरा सामना वेलिंगटनमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी केन विलियम्सन (Kane Williamson) याने वैयक्तिक 25 धावांवरून सुरुवात केली आणि 132 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. यादरम्यान त्याने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक कसोटी धावांची विक्रम नावावर केला. विलियम्सनने न्यूझीलंड संघासाठी आतापर्यंत 92 कसोटी सामने खेळले असून यात 7787 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडचा माजी दिग्गज रॉस टेलर (Ross Taylor) याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 112 सामने खेळले आणि यात 7684 धावा साकारल्या. विलियम्सन न्यूझीलंडचा सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज बनला असला, तरी हा विक्रम यापूर्वी टेलरच्याच नावावर होता. विलियम्सनच्या या कामगिरीनंतर टेरने स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावरून त्याला शुभेच्छा देखील दिल्या.
दरम्यान, जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःच्या देशासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या खेळाडूंचा विचार केला, तर त्यात भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव अग्रस्थानी येते. सचिनने भारतासाठी 200 कसोटी सामने खेळले असून यात 53.79च्या सरासरीने 15921 धावा केल्या आहेत. यात 51 शतक, तर 68 अर्धशतकांची नोंद आहे.
स्वतःच्या देशासाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारे फलंदाज
सचिन तेंडुलकर 15921 (भारत)
रिकी पाँटिंग 13378 (ऑस्ट्रेलिया)
जॉक कॅलिस 13289 (दक्षिण आफ्रिका)
ऍलस्टर कूक 12472 (इंग्लंड)
कुमार संगकारा 12400 (श्रीलंका)
ब्रायन लारा 11953 (वेस्ट इंडीज)
युनिस खान 10099 (पाकिस्तान)
वेन विलियम्सन 7787 (न्यूझीलंड)*
मुशफिकर रहीम 5321 (बांगलादेश)
ऍन्डी फ्लॉवर 4794 (झिम्बाब्वे)
असगर अफगाण 440 (अफगाणिस्तान)
केविन ओब्रायन 258 (आयर्लंड)
(Kane Williamson has become New Zealand’s highest Test run-scorer)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियन महिलांनी रचला इतिहास! टी20 विश्वचषक जिंकण्याची दुसरी हॅट्रिक, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
BREAKING: महिला क्रिकेटवर ऑस्ट्रेलियाचीच सत्ता! दक्षिण आफ्रिकेला नमवत सहाव्यांदा उंचावला टी20 विश्वचषक





