ख्राइस्टचर्चच्या हॅग्ली ओव्हल स्टेडियमवर रविवारपासून (३ जानेवारी) न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला विशेष कामगिरी करता आली नाही. त्यांचा पहिला डाव अवघ्या २९७ धावांवर संपला. प्रत्युत्तरात केन विलियम्सन याने ‘कॅप्टन्स इनिंग’ खेळत पहिल्या डावात संघाला ३६२ धावांची आघाडी मिळवून दिली. यासह त्याने कसोटी क्रिकेटमधील मोठा विक्रम मोडला आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सन याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत द्विशतकी खेळी केली. ३६४ चेंडूंचा सामना करत २८ चौकारांच्या मदतीने त्याने २३८ धावांची तूफानी खेळी केली. अखेर पाकिस्तानी गोलंदाज फहीम अशरफ याने शान मसूदच्या हातून त्याला झेलबाद केले.
महत्त्वाचे म्हणजे, विलियम्सनचे हे कसोटी कारकिर्दीतील चौथे द्विशतक होते. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये तीन द्विशतके करणाऱ्या तब्बल १४ दिग्गजांना मागे टाकले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये तीन द्विशतक झळकवणाऱ्या १५ जणांच्या यादीत पूर्वी विलियम्सनचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त स्टिव्ह स्मिथ, चेतेश्वर पुजारा, जो रुट, अझर अली, रॉस टेलर, ख्रिस गेल, गॅरी कस्टर्न, व्हिव रिचर्ड, स्टिफन फ्लेमिंग, केविन पिटरसन, जस्टीन लँगर, सनथ जयसुर्या या दिग्गजांनी कसोटीमध्ये तीन द्विशतक झळकावली आहेत.
परंतु आता पाकिस्तानविरुद्ध कसोटी कारकिर्दीतील चौथे द्विशतक करत विलियम्सन या सर्व दिग्गजांवर वरचढ ठरला आहे. याबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये ४ द्विशतके करणाऱ्या ९ फलंदाजांची त्याने बरोबरी केली आहे. विलियम्सनपुर्वी झहीर अब्बास, सर लिओनार्ड हटन, ग्रेग चॅपेल, मोहम्मद युसूफ, ब्रेंडन मॅक्यूलम, सुनिल गावसकर, हाशिम अमला, मिचेल क्लार्क आणि सर गॉर्डन ग्रिनिज यांनी कसोटीत चार द्विशतके केली आहेत.
३० वर्षीय विलियम्सनने केवळ ८३ कसोटी सामन्यात चौथ्या द्विशतकाची नोंद केली आहे. आतापर्यंत त्याने ८३ कसोटी सामन्यात ७१५५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या द्विशतकांसह २३ शतके आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीत शुन्यावर बाद होणं महापाप! ‘या’ तीन आशियायी फलंदाजांनी तर सलग तीन डावात केलंय हे काम
निकाल तर शंभर टक्के लागणार, परंतू पाहा काय आहे श्रीलंका-दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्याची सद्यस्थिती
चालू कसोटी सामन्याच्या शेजारी चिमुकल्यांनी मांडला क्रिकेटचा डाव, फोटो सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ