बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान सिल्हेट येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाने जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले. संघाचा अनुभवी फलंदाज केन विलियम्सन याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 29 वे शतक यावेळी पूर्ण केले.
बांगलादेश संघाने आपल्या पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना 310 धावा बनवल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दोन बळी लवकर गेल्यानंतर केन याने संघाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने 205 चेंडूंमध्ये 11 चौकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. हे त्याच्या कारकिर्दीतील 29 वे कसोटी शतक ठरले.
1️⃣0️⃣0️⃣+ score for a fourth Test in a row 🤯
Brilliant from Kane Williamson 👌#WTC25 | 📝 #BANvNZ: https://t.co/7Q7ZQXLB2b pic.twitter.com/IVzYIMDav6
— ICC (@ICC) November 29, 2023
या शतकासह त्याने सर डॉन ब्रॅडमन व विराट कोहली यांच्या 29 कसोटी शतकांची बरोबरी केली. तसेच 32 व्या वर्षी सलग तीन सामन्यात कसोटी शतके करणारा तो पहिला फलंदाज बनला.
दुसऱ्या दिवसाच्या खेळाचा विचार केल्यास न्यूझीलंड संघाची आपल्या पहिल्या डावातील सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कॉनवे केवळ 12 धावा करून माघारी परतला. लॅथमनेही 21 धावा बनवल्या. त्यानंतर केन व निकोलस यांनी अर्धशतके भागीदारी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर आलेल्या डेरिल मिचेल याने 41 तर ग्लेन फिलिप्स याने 42 धावांचे योगदान दिले. केन विलियम्सन याने 104 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंड 8 बाद 266 अशा धावसंख्येवर होता. न्यूझीलंड अजूनही 44 धावांनी पिछाडीवर असून, तिसऱ्या दिवशीचा खेळ निर्णायक ठरू शकतो.
(Kane Williamson Hits 29 Test Century Against Bangladesh Eqauals Virat And Bradman)
महत्वाच्या बातम्या
आमिरच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाबाबत मोहम्मद हाफीजचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘मी स्वत: त्याला…
‘माझं नाव व्हीव्हीएस लक्ष्मण आहे’, पहा असं का म्हणाला इशान किशन