---Advertisement---

विश्वचषक 2023 पूर्वी सर्वात मोठी गुड न्यूज! दिग्गज केन विलियम्सन फूल फिट

On: मंगळवार, सप्टेंबर 5, 2023 12:12 AM
kane williamson
---Advertisement---

न्यूझीलंडचा दिग्गज केन विलियम्सन इंडियन प्रीमियर लीग 2023दरम्यान अहमदाबादध्ये दुखापग्रस्त झाला होता. याच कारणास्तव मागच्या काही महिन्यांपासून मैदानातून बाहेर होता. पण सोमवारी (4 सप्टेंबर) न्यूझीलंडसह जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी चांगली बातमी समोर आली. विलियम्सन ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाचा भाग असणार आहे.

न्यूझीलंडचा दिग्गज केन विलियम्सन (Kane Williamson) आयपीएल 2023 (IPL) मध्ये गुजरात टायटन्सचा भाग होता. लीगच्या पहिल्याच सामन्यात झेलघेत असताना त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याला संपूर्ण आयपीएल हंगामातून माघार घ्यावी लागली. या दुखापतीमुळे विलियम्सन काही महत्वाच्या मालिकांनाही मुकला. विश्वचषकात त्याच्या उपलब्धतेबाबत शंका होती. पण आता या शंका दूर झाल्या आहेत.

आयसीसीच्या माहितीनुसार न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, “केन विलियम्सनने रिहॅबदरम्यान अभूतपूर्व साथ दिली आणि थ्याला तज्ञांचे मार्गदर्शन देखील मिळाले. त्याने सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यासाठी कुठलीच कमी सोडली नाहीये. आम्हाला आनंद आहे की, विलियम्सन संघात निवडण्यासाठी तयार आहे. त्याहून चांगली गोष्ट ही आहे की, त्याला स्वतःला पुनरागमनाची कोणतीच घाई नाहीये.”

“मी आधी म्हटल्याप्रमाणे विलियम्सनला देखील रिहॅबिटेशनमध्ये पूर्ण साथ द्यायची आहे. विश्वचषक छोटी स्पर्धा नाहीये. स्पर्धेतील पहिल्या सामन्याआधी पुढच्या महित्यात त्याच्यातील सुधारणेवर आम्ही लक्ष ठेवून असू.” दरम्यान, काही बातम्यांमध्ये असाही अंदाज वर्तवला गेला आहे की, विलियम्सनल विश्वचषकातील सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसेल. पण काही सामन्यांनंतर त्याला संघात घेतले जाईल. आता येत्या कालात विलियम्सच्या फिटनेसबाबत ठोस माहिती समोर येऊ शकते. विलियम्सन न्यूझीलंडसाठी विश्वचषक खेळणार, याबाबत लवकरच अधिकृत घोषणाही केली जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या – 
सुपर फोरमध्ये भारताची दिमाखात एन्ट्री! नेपाळला नमवल्यानंतर पाकिस्तानशी करणार दोन हात
“हिंदुस्थान मुर्दाबाद म्हणाल्यावर…” Middle Finger दाखवण्याविषयी गंभीरचा धक्कादायक खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---