आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आपली कसोटी खेळाडूंची नवी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड तसेच, दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज कसोटी मालिकेत बरी वाईट कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना फायदा नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, मागील जवळपास सहा महिन्यापासून फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याला मात्र जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी पहिले स्थान गमवावे लागले.
केन विलियम्सन पहिल्या स्थानावरून पायउतार
न्यूझीलंडच्या संघाचा कर्णधार केन विलियम्सन २०२१ वर्षाच्या सुरुवातीपासून फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. मात्र, इंग्लंड विरुद्ध खेळलेल्या एका कसोटीत तो केवळ १३ धावा बनवू शकला. या कारणाने त्याला पाच रेटिंग गुणांचे नुकसान झाले आणि तो दुसऱ्या स्थानावर घसरला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ डिसेंबर २०२० नंतर पहिल्यांदाच क्रमवारीत शीर्षस्थानी आला.
ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लॅब्युशेन तिसऱ्या स्थानी कायम आहे तर, न्यूझीलंडविरुद्ध खराब कामगिरी केल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूट एक स्थान घसरून पाचवा क्रमांकावर गेला. याचा फायदा भारतीय कर्णधार विराट कोहलीला झाला आणि तो नव्या क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचे रिषभ पंत आणि रोहित शर्मा अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानी कायम आहेत.
न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा फायदा
इंग्लंडविरुद्ध धमाकेदार पदार्पण करणाऱ्या न्यूझीलंडच्या डेवॉन कॉनवेने थेट ६१ व्या क्रमांकावर धडक मारली. वेस्ट इंडिजविरुद्ध शतक करणारा दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक बाराव्या क्रमांकावर पोहोचला. तर, दक्षिण आफ्रिकेचा अव्वल वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने गोलंदाजांच्या क्रमवारीत सातवे स्थान पटकावले. एन्रिक नॉर्कीएने देखील कारकिर्दीत पहिल्यांदाच पहिल्या ३० गोलंदाजांमध्ये प्रवेश केला.
महत्त्वाच्या बातम्या –
महिला कसोटी सामन्यासाठी दिली वापरलेली खेळपट्टी, इंग्लंडची कर्णधार आपल्याच बोर्डावर संतापली
बीसीसीआयला मोठा दिलासा! ‘त्या’ आयपीएल संघाला नाही द्यावे लागणार ४८०० कोटी रुपये नुकसान भरपाई
टीम इंडियातील ‘हे’ ३ खेळाडू पहिल्यांदाच घेऊ शकतात इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळण्याचा अनुभव