ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात मंगळवारी (1 नोव्हेंबर) इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड (ENGvNZ) हा सामना खेळला गेला. उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात इंग्लंडने 20 धावांनी विजय मिळवला. 180 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson Strike Rate) याने अतिशय धीमा खेळ केला. या विश्वचषकातील आत्तापर्यंतच्या तीनही सामन्यात तो धावांसाठी संघर्ष करताना दिसून आला.
न्यूझीलंड या स्पर्धेतील सध्या तरी सर्वात मजबूत संघ म्हणून समोर आला आहे. अ गटात त्यांनी ऑस्ट्रेलिया व श्रीलंकेविरुद्ध मोठे विजय साजरे करत गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले होते. मात्र, इंग्लंडविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंड न्यूझीलंडसमोर या सामन्यात विजयासाठी 180 धावांचे मोठे लक्ष ठेवले होते. न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर केनच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. एका बाजूने ग्लेन फिलिप्स आक्रमक फलंदाजी करत असताना, केन अतिशय संथ फलंदाजी करत होता.
संघाला 32 चेंडूवर 61 धावांची गरज असताना तो 40 चेंडूंवर 40 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर इतर फलंदाजही धावांचा अपेक्षित वेग राखू शकले नाही व न्यूझीलंडचा पराभव झाला. न्यूझीलंडच्या पराभवासाठी केनची ही फलंदाजी जबाबदार असल्याचे अनेकांनी म्हटले. केवळ याच सामन्यात नव्हेतर, या आधीच्या दोन सामन्यातही केन पूर्णतः अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने 23 धावा करण्यासाठी तितकेच चेंडू घेतलेले. तर श्रीलंकेविरुद्ध 14 चेंडूंवर तो फक्त 8 धावा करू शकला होता. नजीकच्या काळात त्याचा फॉर्म असाच राहिला आहे. न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची दाट शक्यता असून, या महत्त्वाच्या सामन्यातही कर्णधाराचा हाच फॉर्म राहिल्यास न्यूझीलंड संघ अडचणीत येऊ शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बटलर शो’नंतर गोलंदाजांच्या जोरावर इंग्लंडचा शानदार विजय; न्यूझीलंडच्या खात्यात पहिली हार
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कुणालाच जमलं नाही ते बटलरनं केलं! 100व्या टी-20 सामन्यात लावली विक्रमांची रास