NZ vs PAK T20I : न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन पाकिस्तान विरूद्धच्या शेवटच्या 3 टी-20 सामन्यांना मुकणार आहे. दोन संघांदरम्यान हॅमिल्टन येथे झालेल्या दूसऱ्या टी-20 सामन्यात विलियम्सनचे हॅमस्ट्रिंग दुखावले गेले होते. त्यामुळेच तो अर्ध्या सामन्यातून मैदानाबाहेर गेला होता.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने दिल्या अपडेट्स
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने(New Zealand Cricket) आपल्या सोशल मिडीया वरून त्याच्या दूखापतीची आणि पुनरागमणाची दिशा जाहीर केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार “केन विलियम्सन ( Kane Williamson) याला दुकापतीतून सावरण्यासाठी लागणारा वेळ इतक्यात सांगता येणार नाही. दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी त्याला फिट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.” न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांच्यानूसार यष्टीरक्षक फलंदाज टीम सॅफर्ट संघात विलियमसनची जागा घेईल. तसेच तो या सामन्यात यष्टीरक्षण देखील करताना दिसेल. (Kane Williamson ruled out of remaining T20I matches against Pakistan)
Kane Williamson has been ruled out of the remainder of the KFC T20I Series against Pakistan after a scan confirmed he suffered a minor hamstring strain while batting in Sunday’s T20I at Seddon Park. #NZvPAK https://t.co/M2HEbYSlxP
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 15, 2024
पाकिस्तान वर गाजवलंय वर्चस्व
दम्यान, उभय संघांतील या टी-20 मालिकेत यजमान न्यूझीलंडचे पारडे जड दिसले. पहिल्या दोन सामन्यांमध्ये न्यूजीलंडने पाकिस्तानचा पराभव केला असून 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी या दोन्ही डावांमध्ये अनुक्रमे 226 आणि 194 धावा कुटल्या होत्या. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 46 धावांनी, तर दुसऱ्या सामन्यात 21 धावांनी विजय मिळवला.
इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये केन विलियम्सनला आपल्या पहिल्याच सामन्यात गंभीर दुखापत झाली होती. या सामन्यानंतर गुजरातसाठी तो संपूर्ण हंगामात खेळू शकला नाही. त्यानंतर मैदानात पुनरागमन करण्यासाठी त्याला 6 महिन्यांचा वेळ लागला. वनडे विश्वचषक 2023 मधून त्याने न्यूझीलंड संघात पुनरागमन केले. पण त्यानंतर आता पुन्हा एकदा दुखापत झाल्याचे समोर येत आहे. ही बाब न्यूझीलंड संघाची चिंता वाढवणारी ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘हा’ संघ झिंबाब्वे क्रिकेटचे भाग्य उजळवेल; कर्णधाराने केले संघाचे कौतुक
INDvsAFG: ‘कर्णधार माझ्यावर खूश पण…’, दुसऱ्या टी20 विजयानंतर शिवम दुबेची लक्षवेधी प्रतिक्रिया