---Advertisement---

न्यूझीलंडला जबर धक्का! विलियम्सनला घेरले दुखापतीने, दुसऱ्या कसोटीतून झाला बाहेर

On: बुधवार, जून 9, 2021 8:17 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याआधी न्यूझीलंड संघ इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर दुसऱ्या सामन्याला गुरुवारपासून (१० जून) एजबॅस्टन येथे सुरुवात होत आहे. मात्र, या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला एक जबर धक्का बसला. संघाचा कर्णधार केन विलियम्सन हा या सामन्यातून बाहेर पडला आहे.

विलियम्सन झाला जायबंदी
न्यूझीलंड संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी अखेरचा सामना १० जूनपासून खेळायचा आहे. या सामन्यात विजय मिळवून ऐतिहासिक अंतिम सामन्यापूर्वी आत्मविश्वास मिळविण्याचा न्यूझीलंड संघाचा प्रयत्न असेल. परंतु, या महत्वपूर्ण सामन्यात संघाचा कर्णधार केन विलियम्सन कोपराच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.

न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी त्याच्या दुखापतीबद्दल सांगताना म्हटले, “केनला मार्च महिन्यात झालेल्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले आहे. कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी त्याला या सामन्यात न खेळविण्याचा निर्णय घेतला गेला. त्याच्या जागी विल यंग तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. संघाचे नेतृत्व टॉम लॅथमच्या हाती देण्यात आले आहे.”

या दुसऱ्या सामन्यातून वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

https://twitter.com/ICC/status/1402598029740285954

पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने गाजवले वर्चस्व
लॉर्ड्सवर झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने वर्चस्व गाजवले होते. पदार्पण करणारा सलामीवीर डेवॉन कॉनवेने शानदार द्विशतक झळकावत संघाला ३७८ पर्यंत मजल मारून दिली. त्यानंतर, टिम साऊदीच्या ६ बळींमुळे इंग्लंड चा पहिला डाव २७५ धावांवर गुंडाळला गेला. इंग्लंडकडून रॉरी बर्न्सने शतकी खेळी केली. सामन्याचा तिसरा दिवस पावसामुळे वाया गेल्याने अखेरच्या दोन दिवसांचा खेळ काहीसा निराश झाला व सामना अनिर्णित अवस्थेत सुटला.

महत्त्वाच्या बातम्या – 

शेफाली भारतीय क्रिकेटची ‘फ्युचर स्टार’, भारतीय दिग्गज क्रिकेटपटूने थोपटली पाठ

‘वर्तमान काळातील महान फलंदाज’, माजी इंग्लिंश दिग्गजाने उधळली विराट आणि विलियम्सनवर स्तुतीसुमने

भारतीय खेळाडूंना द्विशक, शतक आणि ५ गडी बाद केल्यानंतर दिला जातो ‘एवढ्या’ रुपयांचा बोनस, माजी क्रिकेटपटूचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---