यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील दुसरा सेमीफायनल सामना आज (5 मार्च) दक्षिण आफ्रिका विरूद्ध न्यूझीलड संघात खेळला जात आहे. (South Africa vs New Zealand Semifinal 2) दरम्यान दोन्ही संघ लाहोरच्या मैदानावर आमने-सामने आहेत. या सामन्यात न्यूझीलंड संघ प्रथम फलंदाजी करत आहे. दरम्यान न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू केन विल्यमसनने शानदार शतक झळकावले आहे. (Kane Williamson Century) त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या.
या सामन्याचा टाॅस न्यूझीलंडने जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडकडून विल यंग आणि रचिन रवींद्र यांनी सलामी दिली. दरम्यान या दोन्ही फलंदाजांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. दरम्यान युवा खेळाडू रचिन रवींद्रने शानदार शतक झळकावले. त्याने आपल्या 101 चेडूत 108 धावा केल्या. दरम्यान त्याने 13 चौकारांसह 1 षटकार ठोकला.
विल यंग बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. दरम्यान त्याने शानदार शतकी खेळी खेळली. या निर्णायक सामन्यात त्याने 91 चेंडूत शतक ठोकले. त्याने 94 चेंडूत 102 धावा केल्या आणि मुल्डरच्या चेंडूवर तो झेलबाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड सामन्यात पावसाने हजेरी लावल्यास, रिझर्व्ह डे असणार का नाही?
सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय, पाकिस्तानला मोठा फटका बसण्याची शक्यता!
वरुण चक्रवर्तीचा आयसीसी रँकिंगमध्ये दणदणीत प्रवेश, 143 स्थानांची झेप घेत थेट या स्थानावर!